मराठी

दैवी दयेची विनवणीमाला

हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

 

संत मारिया फॉस्टिना कोवाल्स्का यांची दैनंदिनी, नोंद क्र. 949

+
येशू, मरिया, योसेफ    12 फेब्रुवारी 1937

+देवाचे प्रेम हे फूल आहे, तर दया हे त्याचे फळ आहे.
ज्या जिवाच्या मनात शंका आहे, त्याने दैवी दयेवरील हे चिंतन वाचावे आणि तिच्यावर विश्वास ठेवावा.

हे पित्याच्या हृदयातून उसळून वाहणाऱ्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

हे देवाचा सर्वश्रेष्ठ गुण असलेल्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

हे आकलनापलीकडचे रहस्य असलेल्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

हे परमपवित्र त्रैक्याच्या रहस्यातून उसळून वाहणाऱ्या दैवी दयेच्या झऱ्या, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

हे मानवांच्या किंवा देवदूतांच्या बुद्धीलाही जिचा ठाव लागत नाही अशा दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

हे जिच्यातून सर्व जीवन आणि सुख उगम पावते अशा दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

हे स्वर्गाहूनही श्रेष्ठ असलेल्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

हे चमत्कार आणि अद्भुत घटनांचा उगम असलेल्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

हे संपूर्ण विश्वाला वेढून राहणाऱ्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे

हे देहधारी शब्दाच्या व्यक्तीत पृथ्वीवर अवतरलेल्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

हे येशूच्या हृदयाच्या उघड्या जखमेतून वाहिलेल्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

हे आमच्यासाठी, विशेषतः पाप्यांसाठी, येशूच्या हृदयात साठवलेल्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

हे पवित्र प्रसादाच्या स्थापनेत प्रकट झालेल्या अथांग दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

हे पवित्र ख्रिस्तसभेच्या स्थापनेत प्रकट झालेल्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

हे पवित्र बाप्तिस्म्याच्या संस्कारात प्रकट होणाऱ्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

हे येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला नीतिमान ठरवण्यात प्रकट झालेल्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

हे आयुष्यभर आमची साथ देणाऱ्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

हे विशेषतः मृत्यूच्या घटकेला आम्हाला कवेत घेणाऱ्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

हे आम्हाला अमर जीवन देणाऱ्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

हे आमच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी आमची साथ देणाऱ्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

हे नरकाच्या अग्नीपासून आमचे रक्षण करणाऱ्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

हे पापात निबर झालेल्या पाप्यांच्या मनपरिवर्तनात प्रकट होणाऱ्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

हे देवदूतांना विस्मयचकित करणाऱ्या आणि संतांच्याही आकलनापलीकडे असलेल्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

हे देवाच्या सर्व रहस्यांमधील अथांग दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

हे प्रत्येक दुःखातून आम्हाला वर काढणाऱ्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

हे आमच्या सुखाचा आणि आनंदाचा उगम असलेल्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

हे आम्हाला शून्यातून अस्तित्वात बोलावणाऱ्या दैवी दये, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

हे दैवी दये, देवाच्या हातांनी घडवलेल्या सर्व कृतींना सामावून घेणाऱ्या, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

हे दैवी दये, देवाच्या सर्व हस्तकृतींचा मुकुट असणाऱ्या, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

हे दैवी दये, आम्ही सारे तुझ्यात बुडून गेलो आहोत; माझा तुझ्यावर विश्वास आहे.

हे दैवी दये, व्याकूळ अंतःकरणांना गोड दिलासा देणाऱ्या, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

हे दैवी दये, निराश जीवांची एकमेव आशा असणाऱ्या, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

हे दैवी दये, अंतःकरणांना विसावा देणाऱ्या आणि भीतीच्या क्षणी शांती देणाऱ्या, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

हे दैवी दये, पवित्र जीवांना आनंद आणि परमानंद देणाऱ्या, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

हे दैवी दये, आशेला काहीच आधार उरला नसतानाही आशा जागवणाऱ्या, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

+ हे सनातन देवा, तुझी दया अथांग आहे आणि तुझ्या करुणेचा खजिना अक्षय आहे. आमच्याकडे कृपादृष्टीने पाहा आणि आमच्यात तुझी दया वाढव, म्हणजे कठीण प्रसंगी आम्ही आशा सोडणार नाही आणि खचूनही जाणार नाही, तर मोठ्या विश्वासाने स्वतःला तुझ्या पवित्र इच्छेला सोपवू. तुझी इच्छा म्हणजे साक्षात प्रेम आणि दया आहे” (दैनंदिनी 950).

+ हे आकलनापलीकडील, अमर्याद दैवी दये, तुझा यथोचित गौरव आणि आराधना कोण करू शकेल? हे सर्वशक्तिमान देवाच्या सर्वोच्च गुणा, तू पापी माणसाची गोड आशा आहेस. हे ताऱ्यांनो, हे पृथ्वी आणि हे समुद्रा, एकत्र या आणि एका सुरात, कृतज्ञतेने व उत्कटतेने आकलनापलीकडील दैवी दयेचे स्तोत्र गा (दैनंदिनी 951).

दैवी दयेच्या आणखी प्रार्थना


सर्व हक्क राखीव: © मजकुराचे संकलन – उर्शुला ग्झेगोर्चिक सल्ला – सिस्टर मारिया कालिनोव्स्का, दयाळू येशूच्या धर्मभगिनींचा संघ. स्रोताचे पूर्ण नाव नमूद करण्याच्या अटीवरच मजकुराची प्रत काढता येईल © अनुवाद: एवा ओल्शोवा, प्रतसंपादन: मॅथ्यू विनॉल