मराठी

चिंतन 324: ज्याची आतुरतेने वाट पाहतो तो क्षण

जीवनात तुम्हाला कशाची आस आहे?  इतर सर्व गोष्टींपेक्षा तुम्हाला अधिक हवी असलेली एकच गोष्ट निवडायची झाली, तर ती कोणती असेल?  ती मृत्यू असेल का?  बहुधा नाही.  पण आश्चर्याची गोष्ट अशी की, एखाद्या थोर संताला जीवनातील इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा मृत्यूचीच अधिक आस असेल.  अकाली मृत्यूची किंवा स्वतः ठरवलेल्या मृत्यूची नव्हे; तर…

पुढे वाचा

चिंतन 323: तुमचे अनन्य ध्येय

देव प्रत्येकाला एक अनन्य ध्येय देतो. काहींना लोकांसमोर वावरणारे जीवन जगण्याचे पाचारण मिळते, तर काहींना शांत आणि साधे जीवन जगण्याचे. काहींना आपल्या बुद्धीचा प्रभावीपणे उपयोग करण्याचे पाचारण मिळते, तर काहींना आपल्या हृदयाचा विशेष रीतीने उपयोग करण्याचे. पण देवाने प्रत्येकाला एक अनन्य ध्येय दिले आहे. तुमचे ध्येय काय…

पुढे वाचा

चिंतन 322: गर्वाचा अडथळा

प्रभू आपल्या अपार दयेने रात्रंदिवस तुमच्याकडे येतो, आणि तुमचा आत्मा त्याच्यासाठी खुला असतो तेव्हा तो आनंदाने त्यात प्रवेश करतो.  कितीही मोठे संघर्ष असले तरी आपला प्रभू तुमच्याकडे येण्याचे थांबवत नाही.  पण एक गोष्ट मात्र आपल्या प्रभूला तुमच्यापासून दूर ठेवते.  ती म्हणजे गर्व.  गर्व हा सर्व पापांची जननी आहे…

पुढे वाचा

चिंतन 321: सेराफिमसारखा आत्मा

प्रत्येकाला पावित्र्याचे पाचारण आहे आणि त्या पावित्र्यात प्रत्येकाला परिपूर्ण आनंद मिळू शकतो. पण देव नेहमीच काही जणांना पावित्र्याच्या एका विशेष कार्यासाठी, म्हणजे पावित्र्याच्या अधिक उंच पातळीवर पोहोचण्यासाठी, निवडतो. अशा आत्म्यांना “सेराफिमसारखे आत्मे” म्हणता येईल. हे समजून घेण्यासाठी पाण्याच्या दोन पेल्यांची तुलना करण्याचे नेहमीचे उदाहरण घेऊ या. एक पेला मोठा आहे…

पुढे वाचा

चिंतन 320: उत्साही हृदय

जीवनात सर्वांत सहज जमणाऱ्या गोष्टींपैकी एक म्हणजे आळशीपणे दिवस घालवणे. कल्पना करा की तुमच्यावर कोणतीही जबाबदारी नाही, तुम्हाला हवी तेवढी संपत्ती तुमच्याकडे आहे आणि तुम्ही ऐषआरामात व निवांतपणे दिवस घालवू शकता. अशाने तुमचे हृदय फार आळशी होईल आणि फार उदासही होईल. विश्रांती घेणे चांगले आहे…

पुढे वाचा

चिंतन 319: एकटेपणाला सामोरे जाताना

एकटेपणा ही अनेकांना सोसावी लागणारी खोल वेदना आहे. ती इतकी बोचते, याचे एक कारण म्हणजे एकटेपणा जाणवणाऱ्या व्यक्तीला ती वेदना एकट्यानेच सोसावी लागते. तिचे दुःख हलके करायला फार थोडी माणसे असतात, कधी तर कोणीच नसते. तसे नसते, तर त्या व्यक्तीला एकटेपणा जाणवला नसता. विशेष म्हणजे, ज्यांच्या भोवती इतर माणसे असतात त्यांनाही..

पुढे वाचा

चिंतन 318: उदासीनता आणि विसरभोळेपणा

समजा, तुमचे लग्न झाले आहे आणि तुम्ही आपल्या जोडीदाराबद्दल अनेकदा उदासीन राहता. ही एक समस्या ठरेल. उदासीनता म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या भल्याची मनापासून काळजी न घेणे. विसरभोळेपणा हे उदासीनतेचे एक लक्षण आहे, कारण एखाद्या गोष्टीची फारशी काळजी नसली की तिचा सहज विसर पडतो. उदाहरणार्थ…

पुढे वाचा

चिंतन 317: इतरांना दोषी ठरवणे

दुसऱ्याला दोषी ठरवणे फार सोपे असते, पण तसे करण्यापासून स्वतःला आवरणे फार कठीण असते. असे का? दुसऱ्याच्या अंतःकरणात काय आहे हे खरोखर माहीत नसतानाही तुम्ही इतक्या सहजपणे त्याला दोषी का ठरवता? या पापाची अनेक कारणे असू शकतात; त्यांपैकी एक…

पुढे वाचा

चिंतन ३१६: प्रेमाची धगधगती ज्वाला

देवाच्या प्रेमाचे वर्णन करण्यासाठी आपण अनेक प्रतिमा वापरतो. त्यांपैकी एक म्हणजे “प्रेमाची धगधगती ज्वाला”. संत जॉन ऑफ द क्रॉस यांच्या “प्रेमाची जिवंत ज्वाला” या अभिजात आध्यात्मिक ग्रंथात ही प्रतिमा दिसते…

पुढे वाचा

चिंतन 315: दया, दया आणि आणखी दया

देवाच्या दयेविषयी बोलण्याचा तुम्हाला कंटाळा येतो का? तेच ते पुन्हा सांगितले जाते आणि त्याचा मनावर काहीच ठसा उमटत नाही, असे तुम्हाला वाटते का? तसे असेल, तर दयेविषयी आणखी बोला आणि नव्या उत्साहाने तिच्यावर मनन करा. देवाच्या दयेचा तुम्हाला कधीही कंटाळा येऊ देऊ नका. देवाची दया इतकी महान आणि विपुल आहे की स्वर्गात तिचा अफाट विस्तार तुम्हाला स्पष्टपणे दिसेल. ती आपल्या आकलनापलीकडे आहे हे तुम्हाला उमगेल, आणि चिंतन करण्याचा तुम्हाला कधीही कंटाळा येणार नाही…

पुढे वाचा