छायाचित्र अनस्प्लॅशवरून
देव स्वतःला लपवतो. पण का? आपण त्याचा आस्थेने शोध घ्यावा, म्हणून तो गुप्ततेच्या आणि मौनाच्या पडद्याआड लपतो. जगात तुमचे लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींशी तो स्पर्धा करत नाही, कारण तुम्ही त्यालाच तुमच्या इच्छेचे एकमेव ध्येय मानावे, असे त्याला वाटते. तुमच्या हृदयात, पवित्र संस्कारांत, मौनात आणि दिवसभरात तुम्हाला भेटणाऱ्या लोकांमध्ये दडलेल्या देवाचा शोध घेण्याची ओढ बाळगा. प्रभू तिथेच आहे. अगाध दयेने भरलेले त्याचे हृदय तुम्हाला गवसावे म्हणून तो तुमची वाट पाहत आहे. सर्व शक्तीनिशी त्याचा शोध घ्या (पाहा: दैनंदिनी #1591).
आज देवाच्या गुप्त उपस्थितीवर चिंतन करा. देव तुमच्या सभोवती आहे, तो तुम्हाला सतत हाक देत आहे आणि आपल्या हृदयात येण्याचे आमंत्रण देत आहे, याची जाणीव ठेवा. तुम्ही उदासीन झालात किंवा जगातील गोष्टींनी तुमचे लक्ष विचलित होऊ दिलेत, तर तो तुमच्या किती जवळ आहे, हे तुम्हाला कधीच उमगणार नाही. त्याच्या गुप्त उपस्थितीवर चिंतन करा आणि आजच त्याचा शोध घ्यायला संकोच करू नका.
हे प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे, पण कधीकधी ते प्रेम पूर्णपणे जगण्यात मी कमी पडतो. शेवटी फारसे महत्त्व नसलेल्या गोष्टींमध्ये माझे लक्ष कितीतरी भरकटते. पुन्हा तुझ्यावर लक्ष केंद्रित करायला आणि मनापासून तुझा शोध घ्यायला मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
23 नोव्हेंबर – विश्वाचा राजा येशू ख्रिस्त याचा महोत्सव (वर्ष क)




