जोव्हान्नी बेल्लिनी, विकिमीडिया कॉमन्सच्या सौजन्याने
आपल्या दयाळू प्रभूला अधिकाधिक जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो, तेव्हा कधीकधी तो मौन आहे असे वाटते. कदाचित पाप आड आले असेल, किंवा देवाविषयीच्या तुमच्या स्वतःच्या कल्पनेमुळे त्याचा खरा स्वर तुम्हाला ऐकू येत नसेल आणि त्याची खरी उपस्थिती तुम्हाला जाणवत नसेल. इतर वेळी येशू एका कारणासाठी आपली उपस्थिती लपवतो आणि स्वतः प्रकट होत नाही. आपले त्याच्याशी असलेले नाते अधिक गहिरे व्हावे म्हणून तो असे करतो. या कारणामुळे देव मौन आहे असे वाटत असेल, तर काळजी करू नका. हा आपल्या आध्यात्मिक प्रवासाचाच भाग आहे (पाहा दैनंदिनी #18).
आज देवाची उपस्थिती तुम्हाला किती जाणवते, यावर चिंतन करा. कदाचित त्याची उपस्थिती तुम्हाला प्रकर्षाने जाणवत असेल, तर कदाचित तो दूर आहे असे वाटत असेल. आता ही अनुभूती बाजूला ठेवा आणि हे सत्य लक्षात घ्या: तुम्हाला जाणवो वा न जाणवो, देव सदैव तुमच्या अगदी जवळ असतो. त्याच्यावर विश्वास ठेवा आणि तुम्हाला कसेही वाटत असले तरी तो सदैव तुमच्यासोबत आहे, ही खात्री बाळगा. तो दूर आहे असे वाटत असेल, तर प्रथम सदसद्विवेकबुद्धीने आत्मपरीक्षण करा, आड येत असलेले कोणतेही पाप कबूल करा आणि मग तुम्ही ज्या परिस्थितीतून जात आहात, त्याच परिस्थितीत एखाद्या कृतीतून देवावरील प्रेम आणि विश्वास व्यक्त करा.
हे प्रभू, तुझ्यावर आणि माझ्यावरील तुझ्या अपार प्रेमावर माझी श्रद्धा आहे, म्हणून मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू सदैव माझ्यासोबत आहेस आणि माझ्या जीवनाच्या प्रत्येक क्षणी माझी काळजी घेतोस, असा मला विश्वास आहे. माझ्या जीवनात तुझी दैवी उपस्थिती मला जाणवत नाही, तेव्हा तुझा शोध घेण्यास आणि तुझ्यावर आणखी दृढ विश्वास ठेवण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
23 जानेवारी: संत मॅरिअन कोप, कुमारी—अमेरिकेतील ऐच्छिक स्मृतिदिन
संत व्हिन्सेंट, उपयाजक आणि रक्तसाक्षी—ऐच्छिक स्मृतिदिन
(अमेरिकेत 23 जानेवारीला साजरा केला जातो)





