छायाचित्र अनस्प्लॅशवरून
देव स्वतःला लपवतो. पण का? आपण त्याचा आस्थेने शोध घ्यावा, म्हणून तो गुप्ततेच्या आणि मौनाच्या पडद्याआड लपतो. जगात तुमचे लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींशी तो स्पर्धा करत नाही, कारण तुम्ही त्यालाच तुमच्या इच्छेचे एकमेव ध्येय मानावे, असे त्याला वाटते. तुमच्या हृदयात, पवित्र संस्कारांत, मौनात आणि दिवसभरात तुम्हाला भेटणाऱ्या लोकांमध्ये दडलेल्या देवाचा शोध घेण्याची ओढ बाळगा. प्रभू तिथेच आहे. अगाध दयेने भरलेले त्याचे हृदय तुम्हाला गवसावे म्हणून तो तुमची वाट पाहत आहे. सर्व शक्तीनिशी त्याचा शोध घ्या (पाहा: दैनंदिनी #1591).
आज देवाच्या गुप्त उपस्थितीवर चिंतन करा. देव तुमच्या सभोवती आहे, तो तुम्हाला सतत हाक देत आहे आणि आपल्या हृदयात येण्याचे आमंत्रण देत आहे, याची जाणीव ठेवा. तुम्ही उदासीन झालात किंवा जगातील गोष्टींनी तुमचे लक्ष विचलित होऊ दिलेत, तर तो तुमच्या किती जवळ आहे, हे तुम्हाला कधीच उमगणार नाही. त्याच्या गुप्त उपस्थितीवर चिंतन करा आणि आजच त्याचा शोध घ्यायला संकोच करू नका.
हे प्रभू, माझं तुझ्यावर प्रेम आहे, पण कधीकधी माझ्या जगण्यात ते प्रेम पूर्णपणे उतरू शकत नाही. शेवटी फारसं महत्त्व नसलेल्या गोष्टींमध्ये माझं लक्ष इतकं गुंतून जातं की ते तुझ्यापासून दूर होतं. माझं लक्ष पुन्हा तुझ्याकडे वळवायला आणि संपूर्ण अंतःकरणाने तुझा शोध घ्यायला मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
23 नोव्हेंबर –
आजचे संत – संत क्लेमेंट पहिले, पोप व रक्तसाक्षी — ऐच्छिक स्मृतिदिन
संत कोलंबन, मठाधिपती — ऐच्छिक स्मृतिदिन
धन्य मिगेल आगुस्तीन प्रो, धर्मगुरू व रक्तसाक्षी — ऐच्छिक स्मृतिदिन (अमेरिका)
सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन
आगमनकाळातील प्रार्थना आणि चिंतने




