मराठी

चिंतन 326: प्रभूची वाट पाहणे

अधीरतेशी झुंज देण्याचा अनुभव अनेकांना येतो. आपल्याला जे हवे असते, ते हवे त्याच क्षणी मिळावे असे आपल्याला वाटते. वेगाने धावणाऱ्या आपल्या समाजात प्रत्येक गोष्ट लगेच मिळण्याची आपल्याला सवय झाली आहे. काही मिनिटांत संपूर्ण जेवण पुन्हा गरम करता येते, काही सेकंदांत जगभर मजकूर संदेश पाठवता येतात, बातम्या पसरतात…

चिंतन 322: गर्वाचा अडथळा

प्रभू आपल्या अपार दयेने रात्रंदिवस तुमच्याकडे येतो, आणि तुमचा आत्मा त्याच्यासाठी खुला असतो तेव्हा तो आनंदाने त्यात प्रवेश करतो.  कितीही मोठे संघर्ष असले तरी आपला प्रभू तुमच्याकडे येण्याचे थांबवत नाही.  पण एक गोष्ट मात्र आपल्या प्रभूला तुमच्यापासून दूर ठेवते.  ती म्हणजे गर्व.  गर्व हा सर्व पापांची जननी आहे…

चिंतन 317: इतरांना दोषी ठरवणे

दुसऱ्याला दोषी ठरवणे फार सोपे असते, पण तसे करण्यापासून स्वतःला आवरणे फार कठीण असते. असे का? दुसऱ्याच्या अंतःकरणात काय आहे हे खरोखर माहीत नसतानाही तुम्ही इतक्या सहजपणे त्याला दोषी का ठरवता? या पापाची अनेक कारणे असू शकतात; त्यांपैकी एक…

चिंतन 288: उपहासाला सामोरे जाताना मौन

तुम्हाला दृढ श्रद्धेची ही गौरवशाली देणगी लाभली, तर अनेकांना ती दिसेल आणि त्यांना आनंद होईल. पण काहींना मात्र तुमचा मत्सर वाटू शकतो. हा अनुभव दुःखद आणि वेदनादायक असतो. लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या मत्सराला तुम्ही किंवा तुमची श्रद्धा कारणीभूत नाही; त्याला कारण त्याचे स्वतःचे पाप आहे. म्हणून, जर तुम्हाला अनुभव आला तर…

चिंतन 281: देवाची अढळ इच्छा

कधी कधी देवावर आपले गाढ प्रेम असते, तेव्हा त्याच्यासाठी मोठी कार्ये करण्याची प्रबळ प्रेरणा आपल्याला वाटते. तरीही, आपली इच्छा आणि दृढ निश्चय असूनही, देव आपले कार्य पुढे जाऊ देत नाही, असे वाटू शकते. याचे कारण कदाचित असे असेल की प्रभू अजून…

चिंतन 277: तणाव दूर करणारी दया

ताणतणाव हा अनेकदा जीवनाचा एक भाग असतो.  काही जणांना दैनंदिन जीवनात खूप ताण, वैफल्य आणि अगदी तीव्र रागालाही सामोरे जावे लागते.  दुसऱ्याचा राग पाहून तुम्ही सुरुवातीला सावध होऊ शकता आणि भीतीला बळी पडण्याचा मोह होऊ शकतो.  ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे.  दुसऱ्याचा राग तुम्हालाही प्रतिक्रिया द्यायला भाग पाडू शकतो…

चिंतन 274: आपल्या व्रतांचे नूतनीकरण

विवाहित दांपत्यांनी वेळोवेळी, विशेषतः लग्नाच्या महत्त्वाच्या वर्धापनदिनांना, आपल्या विवाहवचनांचे नूतनीकरण करण्याची प्रथा आहे. धर्मगुरू आणि समर्पित धार्मिक जीवन जगणारे स्त्री-पुरुषही आपल्या व्रतांचे व वचनांचे नूतनीकरण करतात. ही प्रथा चांगली आणि पवित्र आहे, कारण आपण सतत नूतनीकरण केले पाहिजे…

चिंतन 265: आवेगांचा धोका आणि आशीर्वाद

देवाने आपल्याला निर्माण करतानाच आवेग दिले. ख्रिस्ती जीवनाच्या वाटचालीत हे आवेग मोठे आशीर्वाद ठरू शकतात किंवा मोठे सापळे बनू शकतात. प्रत्येक आवेगाला कोणती गोष्ट चालना देते, यावर हे सारे अवलंबून आहे. उदाहरणार्थ, रागाचा आवेग चांगल्या किंवा वाईट कामासाठी वापरता येतो. जेव्हा राग आपला ताबा घेतो आणि त्या रागाचे मूळ…

चिंतन 257: देवाची दीर्घकालीन योजना

तुम्ही मनापासून आपल्या प्रभूची सेवा करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा त्या त्या दिवशी त्याची काय इच्छा आहे, हे तो तुम्हाला सांगत असल्याचे जाणवू शकते. ते अगदी स्पष्ट नसेल, तरी तुम्ही अमुक एखादी गोष्ट करावी अशी त्याची इच्छा आहे, असे तुम्हाला जाणवू शकते. तुमच्या जीवनासाठी देवाने आखलेली संपूर्ण योजना तो सहसा तुम्हाला एकाच वेळी…

चिंतन 250: जमिनीवर साष्टांग दंडवत घालून प्रार्थना करणे

प्रार्थना करताना तुम्ही आपल्या प्रभूकडे कसे जाता? प्रेमाने आणि भक्तिभावाने आपला संपूर्ण दिवस त्याला अर्पण करणे आणि दिवसभर आपल्या जिवलग मित्राशी बोलावे तसे त्याच्याशी बोलणे, हे नक्कीच चांगले आहे. पण काही प्रसंगी आपली प्रार्थना उत्कट असली पाहिजे आणि ती व्यक्त करताना…