प्रतिमा सौजन्य: पिक्साबे
तुम्हाला पापस्वीकाराची भीती का वाटते? आपल्या प्रभूच्या कोमल हृदयातून हा गौरवशाली संस्कार तुम्हाला देऊ केला जातो. या गौरवशाली देणगीद्वारे येशू तुमच्या खांद्यावरची ओझी दूर करतो, जेणेकरून तुम्हाला त्याच्या दयेत अधिक पूर्णपणे सहभागी होता येईल. हे तुम्हाला उमगले असते, तर तुम्ही नियमितपणे आणि कोणताही संकोच न बाळगता पापस्वीकारासाठी धाव घेतली असती. हा संस्कार तुमची दयनीय अवस्था उघड करतो म्हणून नव्हे, तर तो तुम्हाला त्या अवस्थेतून बरे करतो आणि ती कायमची दूर करतो म्हणून तो स्वीकारण्याची तुम्हाला ओढ लागली असती (पाहा दैनंदिनी #1602).
समेटाच्या संस्काराच्या देणगीकडे तुम्ही कोणत्या भावनेने पाहता, याचा विचार करण्यासाठी थोडा वेळ द्या. मनात संकोच जाणवत असेल, तर त्यामागचे कारण शोधा. स्वतःच्या पापांना सामोरे जाण्याची भीती वाटते का? धर्मगुरूंना सामोरे जाण्याची भीती वाटते का? तुमच्या निर्णयावर भीतीचा प्रभाव कधीही पडू देऊ नका. या संस्कारातून शेवटी काय लाभते याकडे लक्ष द्या आणि मनातली भीती सोडून द्या. त्यातून तुम्हाला स्वातंत्र्य लाभते आणि तुम्ही देवाशी एकरूप होता. या दयेची तुम्हाला गरज आहे आणि ती स्वीकारल्याचा तुम्हाला कधीही पश्चात्ताप होणार नाही.
हे प्रभू, या गौरवशाली संस्काराच्या भीतीतून मला मुक्त कर. तुझ्या असीम दयेकडे पाहत असतानाच माझ्या पापांकडेही प्रामाणिकपणे पाहायला मला मदत कर. माझ्या हृदयात या दयेची तीव्र इच्छा आणि तिच्यामुळे लाभणाऱ्या स्वातंत्र्याची ओढ निर्माण कर. हे प्रिय प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
25 नोव्हेंबर – अलेक्झांड्रियाची संत कॅथरीन, कुमारी व रक्तसाक्षी




