येशूची दया — Needpix.com वरून
आनंदी असावे, ही आपली सर्वांत मूलभूत इच्छा आहे. आपण जे काही करतो, ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे हे ध्येय गाठण्यासाठीच करतो. पापदेखील आपण या चुकीच्या समजुतीने करतो की त्यातून आपल्याला आनंद मिळेल. पण मानवी जीवनाला पूर्णत्व देणारा आणि खरा आनंद देणारा एकच स्रोत आहे. तो स्रोत म्हणजे देव. तुमच्या अंतःकरणातील प्रत्येक आकांक्षा आपल्या दैवी प्रभूमध्येच पूर्ण होते, म्हणून त्याचा शोध घ्या (पाहा दैनंदिनी #305).
जीवनात तुम्ही काय शोधत आहात? तुम्हाला कशाची आस आहे? तुमच्या सर्व आकांक्षांचे अंतिम ध्येय देव आहे का? केवळ देवच तुम्हाला पुरेसा आहे आणि तोच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतो, असा तुमचा विश्वास आहे का? आज आपल्या ध्येयांकडे पाहा आणि त्या सर्व ध्येयांच्या शेवटी तुम्हाला देवच हवा आहे का, यावर चिंतन करा. तसे नसेल, तर ज्या ध्येयांचा तुम्ही पाठपुरावा करता, ती तुम्हाला अतृप्त आणि रिकामेच ठेवतील. पण देवच तुमचे अंतिम ध्येय असेल, तर तुम्ही अशा मार्गावर आहात, जिथे तुम्हाला आशा करता येईल त्याहूनही अधिक मिळेल.
हे प्रभू, तू आणि तुझी परमपवित्र इच्छा हीच माझ्या जीवनातील एकमेव आस असावी, यासाठी मला मदत कर. माझ्या मनातील अनेक आकांक्षा पारखायला आणि तुझी इच्छा पूर्ण करणे हेच माझे एकमेव ध्येय आहे, हे ओळखायला मला मदत कर. तुझ्या इच्छेत मला शांती लाभो आणि प्रत्येक प्रवासाच्या शेवटी तू मला सापडावास. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
सव्विसाव्या दिवसाची चिंतने:
वाळवंटातील 40 दिवस & क्रुसाजवळचे 40 दिवस
19 मार्च: मरियेचे पती संत योसेफ यांचा महोत्सव
प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य
प्रायश्चित्तकाळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतने
प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य




