आपल्या दैवी प्रभूला सर्व काही माहीत आहे, यात शंका नाही. आपल्या मनातला प्रत्येक विचार आणि आपली प्रत्येक गरज तो जाणतो, याची व्याप्ती आपल्याला कधीही पूर्णपणे समजणार नाही. त्याच्या परिपूर्ण ज्ञानाची जाणीव होऊ लागते तेव्हा कधीकधी आपण अशी अपेक्षा करतो की आपण आपल्या गरजा मान्य केल्या नाहीत तरी तो त्या सगळ्या पूर्ण करील. पण आपण त्याच्याकडे मागावे, अशी आपल्या प्रभूची अनेकदा इच्छा असते. आपण आपल्या गरजा ओळखून त्या विश्वासाने प्रार्थनेत त्याच्यासमोर मांडाव्यात, याला तो फार महत्त्व देतो. आपल्यासाठी काय सर्वांत चांगले आहे हे आपल्याला माहीत नसले, तरी आपण आपले प्रश्न आणि चिंता त्याच्यासमोर मांडल्या पाहिजेत. ही कृती म्हणजे त्याच्या परिपूर्ण दयेवर आपण ठेवलेल्या विश्वासाची अभिव्यक्ती आहे (पाहा दैनंदिनी #295).
तुम्हाला स्वतःच्या गरजांची जाणीव आहे का? जीवनात तुम्हाला कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते, हे तुम्ही शब्दांत सांगू शकता का? कशासाठी प्रार्थना करावी आणि रोजचा त्याग म्हणून आपल्या प्रभूला काय अर्पण करावे, हे तुम्हाला माहीत आहे का? आज तुम्ही काय त्याच्या हाती सोपवावे अशी येशूची इच्छा आहे, यावर चिंतन करा. तुम्ही कोणती गरज ओळखावी आणि त्याची दया मागत ती त्याच्यासमोर मांडावी, असे त्याला वाटते? येशूला तुमची गरज तुम्हाला दाखवू द्या, म्हणजे तुम्ही ती त्याच्यासमोर मांडू शकाल.
हे प्रभू, तुला सर्व काही माहीत आहे, हे मला ठाऊक आहे. तू परिपूर्ण ज्ञान आणि प्रेम आहेस, हेही मला ठाऊक आहे. माझ्या जीवनातली प्रत्येक गोष्ट तू पाहतोस आणि माझा कमकुवतपणा व माझे पाप असूनही तू माझ्यावर प्रेम करतोस. माझे जीवन जसे तुला दिसते तसे ते मलाही पाहता येऊ दे. माझ्या गरजा ओळखताना तुझ्या दैवी दयेवर सतत विश्वास ठेवायला मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
संत योसेफ यांचा नोव्हेना. ही प्रार्थना 10 ते 18 मार्चदरम्यान केली जाते.
पंचविसावा दिवस — ध्यानचिंतन:
वाळवंटातील 40 दिवस & क्रुसापाशी 40 दिवस
प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य
प्रायश्चित्तकाळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतने
18 मार्च – येरुशलेमचे संत सिरिल, बिशप आणि चर्चचे धर्माचार्य





