प्रतिमेचा स्रोत: पिक्साबे.
भूतकाळात किंवा भविष्यकाळात रमून वर्तमान क्षणात न जगण्याचा मोह अनेकांना होतो. भूतकाळातील घटना, पापे, मनाच्या जखमा आणि अशा इतर गोष्टींच्या प्रभावाखाली तुम्ही राहता, तेव्हा तुम्ही भूतकाळात जगता. भूतकाळातील जखमा भरून निघणे आणि त्या काळातील तुमच्या पापांची क्षमा होणे आवश्यक आहे. हे झाल्यावर भूतकाळ सोडून द्या आणि त्याचा तुमच्यावर वाईट परिणाम होऊ देऊ नका. भूतकाळ तुमच्या भल्यासाठी ठरू शकतो, जेव्हा 1) तुम्ही आपल्या चुकांमधून शिकता, 2) जुन्या जखमा भरून निघाल्याने तुम्हाला बळ मिळते, 3) देवाने तुमच्यासाठी जे काही केले आहे त्याचा तुम्ही सतत आनंद मानता. भूतकाळातील पापे आणि जखमा यांचाच विचार करत राहिलात आणि क्षमा मिळवण्याचा व जखमा भरून येण्याचा प्रयत्न केला नाहीत, तर भूतकाळाचा तुमच्यावर वाईट परिणाम होतो. ज्या गोष्टी तुमच्या हातात नाहीत, त्यांचाच विचार सतत तुमच्या मनात घोळत राहतो, तेव्हा तुम्ही भविष्यकाळात जगता. भविष्याची भीती किंवा चिंता वाटणे सहज शक्य आहे. पण भविष्य अजून आलेले नाही, हे लक्षात ठेवा आणि त्याविषयीच्या भीतीने किंवा काळजीने तुमच्यावर अनावश्यक ताण येऊ देऊ नका. आपल्या हाती फक्त हाच क्षण आहे. म्हणून दिवसागणिक, तासागणिक, मिनिटागणिक प्रत्येक क्षण जगणे हे तुमचे नेहमीचे ध्येय असले पाहिजे. या क्षणी मनानेही इथेच राहा. हा क्षण स्वीकारा, तो जगा आणि इथे व आत्ता तुमच्याजवळ असलेल्या देवाच्या प्रेमाचा आणि दयेचा अनुभव घ्या (पाहा दैनंदिनी #1400).
भूतकाळ सोडून देणे तुम्हाला कठीण जाते का? भविष्य आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करताना तुमची धडपड होते का? हा वर्तमान क्षण स्वीकारण्याचा प्रयत्न करा; मग सर्व काही ठीक होईल. आपल्या या प्रवृत्तीवर चिंतन करा आणि विशेषतः आज देवाला तुमच्याकडून काय हवे आहे, याकडे लक्ष द्या. या क्षणावरच आपले लक्ष ठेवा आणि याच क्षणी आपल्या प्रभूला भेटण्याचा प्रयत्न करा. त्याची दया इथे आणि आत्ताच तुमची वाट पाहत आहे.
हे प्रभू, माझ्या भूतकाळात घडलेले सर्व काही मी तुला अर्पण करतो आणि भविष्यात जे काही घडेल ते तुझ्या स्वाधीन करतो. जुन्या जखमांतून आणि पापांतून मला मुक्त कर आणि भविष्याविषयीची माझी चिंता हलकी कर. याच क्षणी तुझी भेट घ्यायला आणि तुझ्या अपार दयेचा अनुभव घ्यायला मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
11 ऑक्टोबर – संत जॉन तेविसावे, पोप — ऐच्छिक स्मरण
यंदा हा दिवस रविवारी येत असल्यामुळे उपासनेत हे स्मरण साजरे केले जात नाही
सदस्य व्हा आमच्या यूट्यूब चॅनेलचे!
नवीन सामग्री प्रसिद्ध झाल्यावर सूचना मिळवा.
ऑक्टोबर महिना समर्पित आहे पवित्र जपमाळेला
अंतर्मनाचा शोध
संत इग्नेशियस यांच्या परंपरेतील बोध आणि ध्यानचिंतन
उपासना वर्षानुसार मांडणी




