मराठी

चिंतन 115: देवाची इच्छा तुम्हाला सुरक्षित ठेवील

क्रूसारोपण — गॅब्रिएल मेत्सू

व्हिडिओ

देवाची इच्छा म्हणजे केवळ त्याने तुमच्या भविष्यासाठी आखलेली योजना नव्हे. तुमच्यासाठी त्याच्या ज्या आशा आणि स्वप्ने आहेत, त्यांपलीकडेही त्याच्या इच्छेचा अर्थ आहे. त्याची इच्छा हा तुमच्या पावित्र्याचा मार्ग आहे आणि तीच सर्वांत मोठ्या सांत्वनाचा व आनंदाचा झरा आहे. त्याची इच्छा सक्रिय आणि निष्क्रिय (अनुमती देणारी) अशा दोन्ही प्रकारे कार्य करते. ती सक्रिय आहे, कारण देवाच्या तुमच्यासाठी निश्चित योजना आहेत; त्या ओळखून स्वीकारण्यास तो तुम्हाला बोलावतो. ती निष्क्रिय आहे, कारण तुमच्या स्वतःच्या आणि संपूर्ण जगाच्या पापांमुळे काही अनिष्ट गोष्टी तुमच्या वाट्याला येऊ देण्यास तो अनुमती देईल. देव एखादी अनिष्ट गोष्ट किंवा दुःख तुमच्या वाट्याला येऊ देतो, तेव्हा घाबरू नका. पित्याने जे घडू दिले त्याचे परिणाम स्वतः अनुभवणारा येशू हे याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. देव जे घडू देतो, त्यामुळे आश्चर्यचकित होऊ नका किंवा तुमच्या श्रद्धेला ठेच लागू देऊ नका. त्याची निष्क्रिय, अनुमती देणारी इच्छा तुम्हाला प्रत्येक गोष्टीत त्याच्यावर विश्वास ठेवण्यास बोलावते. भविष्यात काहीही घडले, तरी त्याच्यावरील तुमची श्रद्धा आणि विश्वास वाढण्यास ती वाव देते. देव जे घडू देतो, त्याला घाबरू नका. (पाहा: दैनंदिनी #541).

देवाने तुमच्या जीवनात ज्या गोष्टी घडू दिल्या, त्यांपैकी कशामुळे तुम्ही गोंधळून गेला आहात किंवा तुमच्या श्रद्धेलाही ठेच लागली आहे, यावर चिंतन करा. आपण काय इच्छितो आणि काय घडू देतो, हे देवाला ठाऊक आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्या अनुमती देणाऱ्या इच्छेला घाबरू नका. तुमच्या वाट्याला जे काही येते, ते श्रद्धेने आणि विश्वासाने स्वीकारण्यास घाबरू नका. देव जे काही घडू देतो, त्यातून तो तुमची कशी काळजी घेतो हे दिसून येते आणि त्याच्यावरील तुमची श्रद्धा व विश्वास वाढतात.

हे प्रभू, दुःख सहन करताना कधीकधी माझ्यावरच्या तुझ्या प्रेमाची आणि तू घेत असलेल्या माझ्या काळजीची मला शंका येते. तू खरोखर माझ्याबरोबर आहेस का, मला आधार देत आहेस का आणि मला मार्ग दाखवत आहेस का, असे प्रश्न मला पडतात. आपल्या जगातील पापाचे सर्व परिणाम सोसण्यासाठी मला आवश्यक ती कृपा दे. तुझा हात माझे रक्षण करतो, या विश्वासाने माझ्या स्वतःच्या पापाचे आणि जगाच्या पापांचे परिणाम धैर्याने झेलण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

25 एप्रिल – संत मार्क यांचा सण

पास्का काळातील प्रार्थना

पास्का काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतने

दैवी दयेवरील आणखी चिंतने

सुवार्तेवरील दैनंदिन चिंतन

आजचे संत आणि सण


ई-पुस्तक आणि मऊ मुखपृष्ठाची छापील आवृत्ती या दोन्ही स्वरूपांत उपलब्ध:

अ‍ॅमेझॉन –  बार्न्स अँड नोबल – गूगल प्ले – आयट्यून्स

दैवी दयेवरील दैनिक चिंतन:
संत फॉस्टिनासोबत 365 दिवस