मराठी

चिंतन 290: शारीरिक वेदनांचे मुक्तिदायी रूपांतर

मृत्युशय्येवरील लिझ्यूच्या संत थेरेस, अज्ञात कलाकाराची कलाकृती

व्हिडिओ

अनेकांचे आरोग्य उत्तम असते, तर काहींचे तसे नसते. आजारपणामुळे किंवा वृद्धापकाळामुळे काहींना फार शारीरिक त्रास सहन करावा लागतो. हा त्रास कमी करण्याचे उपाय अनेक जण शोधतात. तरीही या वेदनांमधून देवाची कृपा मिळण्याची संधी असते, हे लक्षात घेतले पाहिजे. सर्वप्रथम, दुःख भोगणारी व्यक्ती जेव्हा ते दुःख स्वेच्छेने स्वीकारते, तेव्हा तिच्या जीवनात विपुल कृपा लाभते. आपल्या शारीरिक वेदना इतरांच्या भल्यासाठी प्रार्थना म्हणून अर्पण केल्या, तर त्यांनाही कृपा लाभू शकते. ही कृपा केवळ दुःख भोगल्याने नव्हे, तर ते दुःख त्याग म्हणून स्वेच्छेने स्वीकारल्याने लाभते. स्वतःच्या इच्छेचा असा त्याग केल्याने स्वर्गातील दयेच्या भांडाराचे दार उघडते. शारीरिक वेदनांचे असे अर्पण पाहून देव प्रसन्न होतो. त्या वेदना आपण स्वेच्छेने स्वीकारतो, याचा त्याला विशेष आनंद होतो. आपल्या शारीरिक वेदना व त्रास यांचे रूपांतर आपल्या आणि इतरांच्या जीवनात देवाच्या दयेत होऊ देण्यास कचरू नका (पाहा दैनंदिनी #1428).

तुम्हाला शारीरिक वेदना किंवा त्रास होतो का? तसे असेल, तर तो कमी करण्याचे उपाय शोधणे स्वाभाविक आहे. पण या खोल आध्यात्मिक सत्यावर चिंतन करा: तुमच्या दुःखाचे रूपांतर कृपेत होऊ शकते. याबद्दल शंका वाटत असेल, तर क्रुसाकडे पाहा. आपल्या प्रभूने सोसलेल्या शारीरिक वेदना कदाचित त्याच्या अंतःकरणातील वेदनांइतक्या तीव्र नसतील. तरीही जगाच्या तारणासाठी आपल्या शारीरिक वेदना पित्याला अर्पण करणे, हाही त्याच्या परिपूर्ण इच्छेचा एक भाग होता. प्रत्येक वेदना आणि त्रास स्वेच्छेने स्वीकारण्याचे मोल आहे, याबद्दल शंका बाळगू नका. ते दुःख देवाला अर्पण करा. या अर्पणातून इतरांना आशीर्वाद मिळेल, तसाच तुम्हालाही मिळेल.

हे प्रभू, मला आता जाणवणाऱ्या आणि पुढे जाणवतील अशा सर्व वेदना व त्रास आज मी तुला अर्पण करतो. हे दुःख स्वेच्छेने स्वीकारायला मला मदत कर. प्रिय प्रभू, हे दुःख स्वीकारण्याचा निर्णय मी घेतो आणि ते तुला अर्पण करतो, जेणेकरून तू त्याचे रूपांतर तुझ्या दयेत करू शकशील. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

17 ऑक्टोबर – अंत्युखियाचे संत इग्नेशियस, बिशप व रक्तसाक्षी यांचा स्मृतिदिन

सदस्य व्हा आमच्या यूट्यूब चॅनेलचे!
नवीन सामग्री प्रसिद्ध झाल्यावर सूचना मिळवा.

ऑक्टोबर हा महिना पवित्र जपमाळीला समर्पित आहे

दैवी दयेवरील आणखी चिंतने

सुवार्तेवरील दैनंदिन चिंतन

आजचे संत व सण