मराठी

चिंतन 44: प्रभूची दृष्टी भय दूर करते

आपला प्रभू रात्रंदिवस तुमच्याकडे निरपेक्ष प्रेमाने आणि मायेने पाहतो, हे तुम्हाला माहीत आहे का?  तुमच्या जीवनातली प्रत्येक गोष्ट त्याला माहीत आहे आणि प्रत्येक प्रसंगात तो तुमच्या सोबत चालतो, हे तुम्हाला माहीत आहे का?  यावर विश्वास ठेवणे कठीण वाटू शकते, कारण आपण त्याचा आवाज कानांनी ऐकू शकत नाही, त्याला डोळ्यांनी पाहू शकत नाही किंवा…

चिंतन 364: मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्यांसाठी प्रार्थना

तुमच्या शाश्वत तारणाच्या दृष्टीने तुमच्या मृत्यूची घटका अत्यंत महत्त्वाची आहे. ‘नमो मारिये’ ही प्रार्थना म्हणताना तुम्ही विशेषतः या पवित्र घटकेसाठी प्रार्थना करता. ही एक पवित्र घटका आहे. पण याच घटकेला दुष्ट आत्मा तुमच्यावर पुन्हा एकदा झडप घालून हिरावून घेण्याचा प्रयत्न करील…

चिंतन 360: आध्यात्मिक लढा

मोहात पाडणारा सैतान खरोखर आहे, पण त्याला घाबरण्याचे कारण नाही. त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. तो सुचवतो त्या विचारांना थारा देऊ नका. त्याच्याशी सौदेबाजी करू नका. मोहांना सामोरे जाताना धैर्य धरा, देवाच्या दयेवर विश्वास ठेवा आणि आशा बाळगा. होऊ नका…

चिंतन 344: पापाची चिंता करणे सोडा

हे शीर्षक जरा विचित्र वाटेल.  पापाच्या बाबतीत तुम्ही जागरूक असले पाहिजे, म्हणजेच ते टाळण्यासाठी तुम्ही कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत.  पण देवाच्या दयेची तुम्हाला असलेली समज महासागराच्या तुलनेत पाण्याच्या एका थेंबाएवढीच आहे, हे जर तुमच्या लक्षात आले, तर तुम्ही असे होऊ देणार नाही…

चिंतन 339: निर्मळ आत्मा

हे कदाचित लगेच लक्षात येणार नाही, पण ज्या आत्म्याचे देवावर निर्मळ प्रेम असते, त्याची अनेकांना भीती वाटते. त्यांना वाटणारी ‘भीती’ म्हणजे अशा आत्म्याला विरोध करण्याची भीती. दुष्ट हेतू असलेले लोक अशा व्यक्तीवर हल्ला करण्याचे धाडस करणार नाहीत, कारण तो हल्ला त्यांच्यावरच उलटू शकतो, हे त्यांना माहीत असते. हे अशक्य आहे…