मराठी

चिंतन 357: कृपेच्या प्रेरणा

एखादी व्यक्ती व्याकुळ असते तेव्हा तुम्ही कदाचित तिच्याशी बोलणे टाळता. तिच्याशी बोलण्यात आपला बराच वेळ आणि शक्ती खर्च होईल, असे सहज वाटू शकते. पण तुमच्या संवादाला प्रभू दिशा देत असेल, तर तो थोड्याच वेळात अद्भुत गोष्टी घडवू शकतो. अर्थात, असेही काही प्रसंग असतात…

चिंतन 356: तुमच्या हृदयाची धडधड

जीवनात एखाद्या गोष्टीचा उत्साह वाटला की तुमच्या हृदयाची धडधड वाढते. ही एक स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. म्हणून तुमचे हृदय कधी देवासाठी धडधडते का, याचा विचार करणे चांगले आहे. देवाच्या उपस्थितीने जागणाऱ्या पवित्र आदरयुक्त विस्मयात तुम्ही स्वतःला हरवू देता का? तुम्हाला…

चिंतन 355: निरर्थक बोलणे, आत्म्याच्या आळशीपणाचे लक्षण

काही जण इतरांबद्दल बोलण्यात फार पटाईत असतात. जणू काही त्यांना सगळेच कळते, अशा थाटात ते इतरांबद्दल मोकळेपणाने बोलतात, सतत मते मांडतात आणि त्यांना दोष देतात. तुम्ही अशा लोकांसारखे होऊ नका. इतरांच्या कृतींमध्येच ज्यांचे मन आणि जीभ गुंतलेली असतात…

चिंतन 354: पापाचे जाळे सोडवणे

एखादी व्यक्ती खोटे बोलू लागते आणि तिला त्याची सवय लागते, तेव्हा कालांतराने ती खोटेपणाच्या जाळ्यात अडकते. एक खोटे लपवण्यासाठी दुसरे खोटे बोलावे लागते आणि लवकरच या जाळ्यातून बाहेर कसे पडावे, हे तिला कळेनासे होते. अशा वेळी तुम्ही दया दाखवली पाहिजे. कठोरपणे वागणे फार सोपे असते…

चिंतन 352: ताडन आणि अपराधभावना

देवाच्या ताडनाचा विचार करणे कदाचित सुखावह नसेल. पण त्याचे ताडन खरे आहे आणि ते त्याच्या विपुल दयेची कृती आहे, हे समजून घेतले पाहिजे. जेव्हा आत्मे देवापासून दूर जातात आणि त्याची दया नाकारतात, तेव्हा त्याच्या हृदयाला खोल जखम होते. त्यामुळे देव…

चिंतन 351: देवाला जाणणे की त्याचा अनुभव घेणे

देवाला जाणून घेणे हे तुमचे नेहमीचे ध्येय असले पाहिजे. पवित्र शास्त्राचा अभ्यास, ख्रिस्तसभेची शिकवण आणि संतांची जीवनचरित्रे या सर्वांची या प्रयत्नात मदत होते. पण देवाला जाणणे हे जीवनाचे अंतिम ध्येय नाही. ज्ञान श्रद्धेतून येते आणि श्रद्धा ही देवाची देणगी आहे. पण पूर्णपणे…

चिंतन 350: आराधनेतील सौंदर्य

जग सुंदर आहे आणि त्यातून देवाचे सौंदर्य प्रकट होते; पण पवित्र युकरिस्तासारखी आध्यात्मिक सत्ये त्याहून कितीतरी सुंदर आहेत.  परमपवित्र युकरिस्तात उपस्थित असलेल्या देवाचे सौंदर्य पाहण्यासाठी श्रद्धेची दृष्टी हवी.  हे सौंदर्य अधिक स्पष्टपणे पाहता यावे, यासाठी आराधना हा एक उत्तम मार्ग आहे.  स्वीकारणे जरी…

चिंतन 346: इतरांना लाभलेली वरदाने

इतरांच्या जीवनात देवाने दिलेली वरदाने ओळखणे आणि त्याबद्दल आनंद मानणे, ही त्यांच्याप्रती दया दाखवण्याची एक कृती आहे.  दुर्दैवाने, इतरांचा मत्सर किंवा हेवा करण्याचा मोह अनेकदा होतो, विशेषतः त्यांची नैसर्गिक प्रतिभा किंवा त्यांच्या जीवनातील देवाची कृपा दिसते तेव्हा.  पण…

चिंतन 344: पापाची चिंता करणे सोडा

हे शीर्षक जरा विचित्र वाटेल.  पापाच्या बाबतीत तुम्ही जागरूक असले पाहिजे, म्हणजेच ते टाळण्यासाठी तुम्ही कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत.  पण देवाच्या दयेची तुम्हाला असलेली समज महासागराच्या तुलनेत पाण्याच्या एका थेंबाएवढीच आहे, हे जर तुमच्या लक्षात आले, तर तुम्ही असे होऊ देणार नाही…

चिंतन 343: प्रत्येक गोष्टीत प्रभूचा गौरव करणे

सर्व काही सुरळीत चालले असतानाच कृतज्ञ राहणे सोपे असते. पण कठीण काळात आपण स्वतःचीच कीव करत स्वतःत गुरफटून जातो. तरीही प्रत्येक गोष्टीत प्रभूचा गौरव करायला तुम्ही शिकले पाहिजे. देव तुम्हाला असंख्य आशीर्वाद आणि कृपादाने देतो; त्यांबद्दल तुमच्या मनात अपार…