लुकास क्रानाख (ज्येष्ठ), सार्वजनिक मालकी, विकिमीडिया कॉमन्समार्फत
देवाच्या ताडनाचा विचार करणे कदाचित सुखावह नसेल. पण त्याचे ताडन खरे आहे आणि ते त्याच्या विपुल दयेची कृती आहे, हे समजून घेतले पाहिजे. जेव्हा आत्मे देवापासून दूर जातात आणि त्याची दया नाकारतात, तेव्हा त्याच्या हृदयाला खोल जखम होते. म्हणून त्यांना परत आणण्याच्या अथक प्रयत्नांत देवाची “तळमळ” आणखी वाढते, असे म्हणता येईल. त्यांची हृदये उघडण्यासाठी तो ज्या मार्गांचा उपयोग करतो, त्यांपैकी एक म्हणजे ताडन. उदाहरणार्थ, परुश्यांचा विचार करा. ते गर्वाने आणि अहंकाराने भरलेले होते आणि प्रभूने त्यांना कठोर शब्दांत फटकारले. पण त्यांना परत मिळवण्यासाठीच त्याने हे केले; ही त्याच्या महान दयेची कृती होती. काही जण त्याच्याकडे परत वळले, तर काही वळले नाहीत (पाहा दैनंदिनी #1703).
देव आपले ताडन करतो, याची तुम्हाला जाणीव आहे का? उदाहरणार्थ, आपल्या पापांमुळे तीव्र अपराधभावनेची वेदना तुम्ही कधी अनुभवली आहे का? असेल, तर त्या अनुभवाकडे लक्ष द्या. हे लक्षात ठेवा: तुम्ही भरकटला असाल, विशेषतः गर्वामुळे, तर प्रभू तुमचा न्याय करील आणि तुम्हाला दंड देईल. तुम्ही त्याच मार्गावर हट्टाने चालत राहिलात, तर तो अधिक कठोरपणे दंड देईल. आत्मा हट्टीपणाने आपल्या मार्गाला चिकटून राहतो, तेव्हा देवाची दया त्याच्यात प्रवेश करू शकत नाही. पण या ताडनातून पाप केल्याची पवित्र खंत निर्माण झाली, तर तुमची सदसद्विवेकबुद्धी जागी आहे आणि तुम्ही बदलू शकता, याचे ते लक्षण आहे. अपराधभावना मनात धरून बसू नका, पण तिच्याकडे दुर्लक्षही करू नका. देवाच्या दयेकडे धाव घ्या, म्हणजे तो तुम्हाला तुमच्या पापातून मुक्त करील आणि तुमच्या हृदयात पुन्हा त्याची शांती नांदेल.
हे प्रभू, प्रत्येक गोष्टीत तुझ्याकडे वळण्यासाठी मला आवश्यक ती कृपा दे. तुझ्या दयेतून होणाऱ्या कठोर ताडनाची मला कधीही गरज पडू नये. पण मला या कृपेची गरज पडलीच, तर पापांचा त्याग करून तुझ्याकडे वळण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
आगमनकाळातील ‘हे’ प्रतिगीते
17–23 डिसेंबर
संत आंद्रेय यांची नाताळची नोव्हेना
परंपरेनुसार ही प्रार्थना 30 नोव्हेंबरपासून नाताळच्या पूर्वसंध्येपर्यंत दररोज 15 वेळा म्हटली जाते.





