मराठी

चिंतन 331: तुमच्या शक्तीपलीकडे काहीही नाही

लोरेन्झो लोट्टो, सार्वजनिक मालकी, विकिमीडिया कॉमन्समार्फत

व्हिडिओ

तुमच्या शक्तीपलीकडचा क्रूस वाहण्याची वेळ प्रभू तुमच्यावर कधीही येऊ देणार नाही, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.  यावर तुमचा विश्वास आहे का?  असेल, तर तो विश्वास तुम्हाला पुढच्या वाटेवर नजर ठेवून देवाची इच्छा पूर्ण करत धैर्याने पुढे जाण्यास मदत करील.  तुमच्या वाटेत कितीही मोठ्या अडचणी आल्या, तरी जीवनात तुम्हाला ज्या ज्या प्रसंगांना सामोरे जावे लागते, त्या सर्वांत प्रभू तुमच्यासोबत आहे आणि गरज पडली तर तो तुम्हाला उचलून नेईल, याची खात्री बाळगा.  तुमची नजर त्याच्यावर खिळलेली असेल, तर त्याच्या दयेपासून आणि त्याच्या परिपूर्ण इच्छेपासून तुम्हाला काहीही दूर ठेवू शकणार नाही (पाहा दैनंदिनी क्र. 1607).

प्रभूने तुमच्यासमोर जी वाट ठेवली आहे असे तुम्हाला वाटते, तिच्यावर चिंतन करा.  कोणते अडथळे पार करणे तुम्हाला अशक्य वाटते?  ते अडथळे कोणतेही असोत, आत्मविश्वासाने आणि आपल्या प्रभूवर पूर्ण भरवसा ठेवून त्यांना सामोरे जा.  काही गोष्टी कितीही वेदनादायक असल्या, तरी देवाच्या दयेच्या आवाक्याबाहेर काहीही नाही. तुम्ही त्याला तसे करू दिलेत, तर तो तुमच्यासमोरची खडतर वाट सुकर करील. 

हे प्रभू, तू सदैव माझ्यासोबत आहेस, मला मार्ग दाखवतोस आणि माझे रक्षण करतोस, यावर माझा खरोखर विश्वास आहे.  जीवनात एखादी अडचण आली, तर तुझ्या कृपेवर अधिक विसंबून राहण्याची संधी म्हणून तिच्याकडे पाहायला मला मदत कर.  हे प्रिय प्रभू, तू मला जे काही करण्यासाठी बोलावतोस, ते सर्व मी करू शकतो, हे मला ठाऊक आहे.  तू माझ्यासाठी जी वाट आखली आहेस, त्या वाटेने चालण्याचा मी निश्चय करतो.  हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

27 नोव्हेंबर – अमेरिका: कृतज्ञता दिन—ऐच्छिक स्मरण

दैवी दयेवरील आणखी चिंतने

सुवार्तेवरील दैनंदिन चिंतन

आजचे संत व उत्सव