मराठी

चिंतन ३३२: क्रुसाचा कधीही शीण येऊ देऊ नका

लिओनार्दो दा विंची यांची कलाकृती मानली जाते, सार्वजनिक मालकीची, विकिमीडिया कॉमन्समार्फत

व्हिडिओ

प्रभू संत फॉस्टिनाशी दुःखांविषयी पुष्कळ बोलतो. अपमान आणि शारीरिक आजार यांमुळे तिने खूप दुःख सोसले. तिची दुःखे त्याच्या क्रुसाशी जोडली की त्यांना मोठे सामर्थ्य प्राप्त होते, याची आठवण येशू तिला न थकता करून देत असे. हा संदेश कधीही विसरू नका. दुःख हा काही ‘सुखाचा’ विषय नाही, पण त्याचा खरा अर्थ उमगला की त्यातही आनंद सापडतो. तुमची दुःखे जगात देवाची दया पोहोचवण्याचे साधन होऊ शकतात, हे उमगले की ती स्वीकारण्यास आणि ख्रिस्ताशी जोडण्यास तुम्ही कचरणार नाही. देवाच्या दयेच्या या पवित्र साधनाविषयी कधीही शंका बाळगू नका (पाहा दैनंदिनी #1612).

दुःखे सोसण्याचा आणि त्यांच्याविषयी बोलण्याचाही शीण येऊ शकतो; पण आपली दुःखे प्रभूच्या क्रुसाशी जोडलेली नसतात तेव्हाच असे होते. ती त्याच्या क्रुसाशी जोडली की त्यांचे ओझे हलके होते. हे तुम्हाला उमगले आहे का आणि त्यानुसार तुम्ही जगता का, यावर चिंतन करा. त्यानुसार जगत असाल, तर तुमची दुःखे आता जड ओझे राहिलेली नाहीत, उलट ती आनंदाचा स्रोत झाली आहेत, असे तुम्हाला जाणवेल. अशा पूर्ण समर्पणापर्यंत पोहोचणे कठीण असले, तरी हेच तुमचे पाचारण आहे आणि त्याचे प्रतिफळ तुमची वाट पाहत आहे.

हे प्रभू, मी सोसत असलेली प्रत्येक वेदना आणि प्रत्येक दुःख तुला अर्पण करण्याचा मला कधीही शीण येऊ नये. माझ्यावर मोठी संकटे आली, तर ती तुला अर्पण करण्यास मला मदत कर. किरकोळ त्रास झाले, तर तेही तुला अर्पण करण्यास मला मदत कर. हे प्रिय प्रभू, मी हे सर्व तुझ्या गौरवशाली क्रुसाशी जोडतो आणि या साऱ्याचे रूपांतर करण्याच्या तुझ्या अगाध सामर्थ्यावर भरवसा ठेवतो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

आगमनकाळातील प्रार्थना आणि चिंतने

दैवी दयेवरील आणखी चिंतने

सुवार्तेवरील दैनंदिन चिंतन

आजचे संत आणि सण