मराठी

चिंतन 69: अडचणींमुळे शंका घेण्याचा मोह होतो

प्रतिमा: Needpix.com वरून

व्हिडिओ

आपल्या सर्वांनाच जीवनात अडचणी येतात.  प्रश्न असा आहे: “तुम्ही त्यांना कसे सामोरे जाता?”  अडचणी आल्या की देव खरोखर आपल्या सोबत आहे का, तो दयेने आपल्याला मदत करील का, अशी शंका घेण्याचा मोह आपल्याला कितीतरी वेळा होतो.  पण प्रत्यक्षात याच्या उलटच खरे आहे.  प्रत्येक अडचणीचे उत्तर देवच आहे.  जीवनात आपल्याला जे काही आवश्यक आहे, त्या सर्वांचा स्रोत तोच आहे.  आपल्यासमोर कितीही मोठे आव्हान किंवा संकट असले, तरी आपल्या आत्म्याला शांती आणि स्थिरता देऊ शकणारा तोच आहे (पाहा दैनंदिनी #247).

अडचणींना, विशेषतः त्यांचे गंभीर संकटात रूपांतर होते तेव्हा, तुम्ही कसे सामोरे जाता?  रोजचा ताणतणाव आणि अस्वस्थता, समस्या आणि आव्हाने, चिंता आणि आपल्या उणिवा यांना तुम्ही कसे हाताळता?  स्वतःच्या पापांना आणि इतरांच्याही पापांना तुम्ही कसे सामोरे जाता?  या आणि आपल्या जीवनातील अशा अनेक गोष्टींमुळे देवावर पूर्ण भरवसा ठेवण्याऐवजी मनात शंका येऊ देण्याचा मोह आपल्याला होऊ शकतो.  रोजच्या अडचणींना आणि प्रतिकूल परिस्थितीला तुम्ही कसे सामोरे जाता, याचे चिंतन करा.  जीवनाचा सागर खवळलेला असतानाही शांती आणि मनःशांतीचा स्रोत असलेला आपला दयाळू प्रभू तुमच्या पाठीशी आहे, असा दृढ भरवसा तुम्ही दररोज ठेवता का?  आज त्याच्यावरचा तुमचा भरवसा व्यक्त करा आणि तो कोणतेही वादळ कसे शांत करतो, ते पाहा.

हे प्रभू, केवळ तूच माझ्या आत्म्याला शांती देऊ शकतोस.  आजच्या अडचणींमुळे मला मोह होतो तेव्हा तुझ्यावर पूर्ण भरवसा ठेवून माझ्या सगळ्या चिंता तुझ्यावर सोपवायला आणि तुझ्याकडे वळायला मला मदत कर.  निराशेत मी तुझ्यापासून कधीही दूर जाऊ नये; उलट, तू सदैव माझ्या पाठीशी आहेस आणि मी तुझ्याकडेच वळले पाहिजे, याची मला खात्री असू दे.  हे माझ्या प्रभू, माझा तुझ्यावर विश्वास आहे, माझा तुझ्यावर विश्वास आहे.  हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

अठराव्या दिवसाची चिंतने:
वाळवंटातील 40 दिवस & क्रुसापाशी 40 दिवस

संत योसेफ यांचा नोव्हेना. ही प्रार्थना 10 ते 18 मार्चदरम्यान केली जाते.

प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य

प्रायश्चित्तकाळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतने

दैवी दयेवरील आणखी चिंतने

सुवार्तेवरील दैनंदिन चिंतन

आजचे संत / सण