छायाचित्र: थुई हा बिच, स्रोत: पिक्साबे
व्हिडिओ
तुमच्या आत्म्याला सुंदर काय बनवते? प्रार्थना. तुम्हाला पापापासून दूर काय ठेवते? प्रार्थना. तुमचे मन आशेने काय भरून टाकते? प्रार्थना. पवित्रतेच्या मार्गावर तुम्हाला पुढे काय नेते? प्रार्थना. प्रार्थना ही सर्व गोष्टींची गुरुकिल्ली आहे. प्रार्थनेशिवाय प्रत्येक दिवशी तुमचे जीवन दिशाहीन होते आणि तुम्हाला केवळ स्वतःच्या शहाणपणावर व क्षमतेवर अवलंबून राहावे लागते. अशी अवस्था खरोखरच भयावह आहे (पाहा: दैनंदिनी #146).
तुम्ही प्रार्थना करता का? केवळ अधूनमधून, रविवारच्या मिस्साबलिदानात किंवा जेवणाआधी नव्हे. तुम्ही खरोखर दररोज प्रार्थना करता का? एकांतात काही क्षण घालवून तुम्ही देवाशी अंतःकरणाच्या गाभ्यातून बोलता का आणि त्यालाही तुमच्याशी बोलू देता का? दररोज आणि दिवसभर देवाला तुमच्याशी प्रेमाचा संवाद सुरू करू देता का? आज तुमच्या प्रार्थनेच्या सवयीवर चिंतन करा. दररोज देवाशी होणारा तुमचा संवाद हाच त्या दिवसातला सर्वांत महत्त्वाचा संवाद आहे, असे तुम्ही प्रामाणिकपणे म्हणू शकता का, याचा विचार करा. या संवादाला पहिले स्थान द्या; मग बाकीच्या सर्व गोष्टी आपापल्या जागी बसतील.
हे प्रभू, माझे प्रार्थनेचे जीवन दुर्बळ आहे, हे मला माहीत आहे. तुझ्याशी दररोज होणाऱ्या संवादाकडे मी अधिक लक्ष द्यायला हवे, हेही मला माहीत आहे. दररोज न चुकता प्रार्थना करण्याची पक्की सवय लावायला मला मदत कर, म्हणजे हे प्रार्थनामय जीवन माझ्या वाटेला प्रकाश देईल. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
21 फेब्रुवारी: संत पीटर डेमियन, बिशप आणि ख्रिस्तसभेचे धर्माचार्य
चौथ्या दिवसाची चिंतने:
वाळवंटातील 40 दिवस & क्रुसापाशी 40 दिवस

प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य




