प्रतिमा पिक्साबेवरून
व्हिडिओ
कल्पना करता येईल अशा सर्वांत सुंदर सूर्यास्ताचा विचार करा. संध्याकाळी अथांग समुद्रावर सूर्यास्ताची झळाळी पसरली आहे आणि आकाश रंगांनी उजळून निघाले आहे. किंवा निरभ्र निळ्या आकाशाला भेदून जाणाऱ्या भव्य पर्वतशिखरांचा विचार करा, अथवा उंचावरून प्रचंड वेगाने कोसळणाऱ्या धबधब्याचा. सृष्टीच्या या साऱ्या देणग्या वैभवशाली, सुंदर आणि थक्क करणाऱ्या आहेत. पण देवाच्या दयेच्या गौरवाची आणि भव्य तेजाची सर त्यांपैकी कशालाही येत नाही (पाहा दैनंदिनी #158).
देवाची दया आपल्याला खऱ्या अर्थाने उमगली, तर आपण केवळ थक्क होऊन थांबणार नाही. आपल्यावरच्या त्याच्या परिपूर्ण, कधीही न आटणाऱ्या प्रेमाने आपण विस्मयचकित होऊ. पण कधी कधी त्याच्या दयेचे खरे स्वरूप आपल्याला दिसत नाही. आज तुम्हाला आलेल्या देवाच्या दयेच्या अनुभवावर चिंतन करा. देवाचे स्वरूप त्याच्या पूर्णतेत तुम्हाला उमगते का? त्याच्या दयेच्या अनुभवाने तुमचा आत्मा भारावून गेला, असे क्षण तुमच्या जीवनात आले आहेत का? नसतील, तर त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी वेळ द्या. त्याच्यासमोर नम्र व्हा आणि तुमच्यावरच्या त्याच्या अपार प्रेमावरील पडदा दूर करण्याची त्याला विनंती करा.
प्रभू, तू माझ्या कल्पनेपलीकडे दयाळू आहेस, हे मला माहीत आहे. पण अनेकदा तू कोण आहेस आणि तुझे मार्ग काय आहेत, हे मला समजत नाही. मी तुझ्यापासून दूर आहे आणि वाट चुकली आहे, असे मला वाटते. तुझे प्रेम जाणून घ्यायला मला मदत कर. तुझे वैभव आणि सौंदर्य मला पाहू दे. आणि जसजशी तुझी ओळख मला होत जाईल, तसतसे तुझ्यावर उत्कट प्रेम करण्याकडे माझे मन ओढले जाऊ दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
सुवार्तेवरील आणि दैवी दयेवरील अशी दोन्ही दैनंदिन चिंतने ईमेलद्वारे मिळवा!
सहाव्या दिवसाची ध्यानचिंतने:
वाळवंटातील 40 दिवस & क्रुसाजवळचे 40 दिवस

प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य




