मराठी

चिंतन 56: आजची सुवार्ता

प्रतिमा: डॅन फॅडर, स्रोत: Pixabay

चित्रफीत

लौकिक जग वाईट बातम्यांनी भरलेले आहे. आपले लक्ष टिकवून ठेवण्यासाठी वृत्तपत्रे, चर्चात्मक कार्यक्रम आणि इतर प्रसारमाध्यमे दुःखद घटनांना सनसनाटी रूप देऊन त्या अतिरंजितपणे मांडतात आणि त्यावरच भरभराट करतात. आपणही नवी कुजबुज किंवा टीका इतरांना सांगायला अनेकदा उत्सुक असतो. पण चांगल्या बातमीचे काय? देवाच्या विपुल दयेची सुवार्ता आपण किती वेळा लक्षात घेतो? हा संदेश किती वेळा तुमचे मन वेधून घेतो? देवाच्या दयेविषयी जगाला सांगण्याचा प्रयत्न तुम्ही किती वेळा करता? (पाहा दिनदर्शिका #164)

दररोज इतरांना कोणती गोष्ट सांगण्याची तुम्हाला सर्वाधिक उत्सुकता असते, यावर चिंतन करा. देवाच्या चांगुलपणाविषयी आणि दयेविषयी बोलताना तुम्हाला जो आनंद मिळतो, त्याचा विचार करा. देव किती महान आहे, हे सांगून तो आनंद इतरांबरोबर वाटण्याची संधी आज शोधा. या आठवड्यात देवाचे सौंदर्य आणि चांगुलपणा कशाकशातून दिसून आला, ते आठवा आणि देव तुमच्या वाटेवर ज्या व्यक्तींना आणतो, त्यांच्याशी त्याच्या कार्याविषयी बोला.

हे प्रभू, लौकिक जगातील सनसनाटीपणा आणि नकारात्मकता यांच्यापासून दूर होण्यास मला मदत कर. त्याऐवजी माझी दृष्टी तुझ्याकडे आणि तुझ्या गौरवाकडे वळवण्यास मला मदत कर. तुझ्याविषयी मोकळेपणाने आणि आनंदाने बोलता यावे म्हणून मला धैर्य, सुज्ञपणा आणि प्रेम दे. हे प्रभू, सर्वत्र सांगितली गेली पाहिजे ती सुवार्ता तूच आहेस. तुझ्या कार्याचे साधन होण्यास मला मनापासून तयार कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

सुवार्तेवरील आणि दैवी दयेवरील अशी दोन्ही दैनंदिन चिंतने ईमेलद्वारे मिळवा!

सातव्या दिवसाची ध्याने:
वाळवंटातील 40 दिवस & क्रुसाजवळचे 40 दिवस

दैवी दयेवरील आणखी चिंतने

सुवार्तेवरील दैनंदिन चिंतन

आजचे संत / सण