दयाळू सामरी. चित्रकार: मेस्टर व्हान दे बार्महार्टिखे सामारिटान
‘सहानुभूती’ आणि ‘करुणा’ यांत काही फरक आहे का? असेल तर तो काय? आणि यांपैकी कोणती अधिक इष्ट आहे? सहानुभूती म्हणजे दुसऱ्याच्या दुःखामुळे आपल्याला वाईट वाटणे. एका अर्थी, आपल्याला त्या व्यक्तीची कीव येते. पण करुणा याहीपलीकडे जाते. करुणा म्हणजे आपण इतरांच्या दुःखात सहभागी होतो आणि त्यांचे ओझे त्यांच्याबरोबर वाहतो. आपल्या प्रभूने आपल्याबरोबर आणि आपल्यासाठी दुःख सोसले, तसे आपणही त्यांच्याबरोबर दुःख सोसतो. आपण एवढेच साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे: इतरांना खरी करुणा दाखवावी आणि त्यांनीही आपल्याला करुणा दाखवावी, असे त्यांना आमंत्रण द्यावे (पाहा दैनंदिनी #279).
हे तुम्हाला कितपत जमते? तुम्ही इतरांना कितपत खरी करुणा दाखवता? इतरांचे दुःख पाहून तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा आणि ख्रिस्तामध्ये त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करता का? आणि जेव्हा तुम्ही स्वतः दुःख भोगता, तेव्हा इतरांच्या करुणेने तुम्ही तुमचा आत्मा भरून जाऊ देता का? त्यांच्यामार्फत देवाची दया तुमच्यापर्यंत पोहोचू देता का? की इतरांनी तुमची केवळ कीव करावी अशी अपेक्षा ठेवून तुम्ही स्वतःची कीव करण्याच्या सापळ्यात अडकता? या दोन वृत्तींमधला फरक मननात घ्या आणि सर्वांबद्दल खरी करुणा बाळगणारे हृदय तुम्हाला द्यावे, अशी आपल्या प्रभूकडे विनंती करा.
हे प्रभू, मला दयेने आणि करुणेने भरलेले हृदय दे. इतरांच्या गरजांकडे लक्ष द्यायला आणि तुझ्याच दैवी हृदयाने त्यांच्या मदतीला धावून जायला मला मदत कर. ज्यांना गरज आहे त्या सर्वांपर्यंत तुझी आरोग्यदायी कृपा पोहोचवण्याची ओढ मला लागो. मी कधीही स्वतःची कीव करण्यात गुरफटून जाऊ नये, किंवा इतरांनी माझी कीव करावी अशी अपेक्षाही ठेवू नये. उलट, इतरांच्या प्रेमातून तुझे हृदय मला जी करुणा देऊ इच्छिते, ती स्वीकारायला माझे मन खुले असो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
प्रायश्चित्तकाळातील चौथ्या रविवारसाठी ध्यान:
वाळवंटातील 40 दिवस
संत योसेफ यांचा नोव्हेना. ही प्रार्थना 10 ते 18 मार्चदरम्यान केली जाते.
प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य
प्रायश्चित्तकाळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतने




