मराठी

चिंतन 164: पापी जनांच्या आत्म्यांसाठी तळमळ

एखाद्या व्यक्तीचे पाप उघडपणे दिसते, तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असते?  पुष्कळ जण अशा व्यक्तीकडे तुच्छतेने पाहतात आणि तिचा कठोरपणे न्याय करतात.  कोणी कायदा मोडला की आपण त्याचा कठोर निषेध करतो.  कोणी अनैतिक जीवन जगत असेल, तर आपण त्याला कमी लेखतो.  अनेकदा आपला दृष्टिकोन…

पुढे वाचा

चिंतन 163: आपल्या “दयनीय अवस्थेत” देवाचा गौरव करणे

तुम्हाला स्वतःच्या आत्म्याची दयनीय अवस्था दिसते का? असा प्रश्न काहींना खटकू शकतो. पण देवाची दया आपल्याला समजली आणि आपल्या “दयनीय अवस्थेतूनच” त्याचा सर्वाधिक गौरव होऊ शकतो, हे आपल्याला उमगले, तर आपण असा विचार करणे टाळणार नाही. अनेकांना…

पुढे वाचा

चिंतन 162: प्रकाश अंधार दूर करतो

प्रकाश अंधार दूर करतो. विज्ञानाच्या दृष्टीने पाहता, प्रकाश आणि अंधार या परस्परविरोधी शक्ती नाहीत; अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. प्रकाश आला की अंधार उरत नाही. देवाच्या दयेचेही तसेच आहे. दयेशिवाय आपल्या आत्म्यात अंधार असतो. आपण शंकेच्या आणि गोंधळाच्या गर्तेत सापडतो…

पुढे वाचा

चिंतन 161: तुम्हाला लाभलेले अनन्य प्रेम

देवाच्या प्रेमाचे आणि दयेचे चिंतन करताना, त्याचे प्रेम म्हणजे जणू सर्वांना सारख्याच रीतीने आणि समान प्रमाणात वाटलेली देणगी आहे, असे मानण्याचा मोह होऊ शकतो. पण देवाचे तुमच्यावरचे प्रेम हे सर्वांना दिलेल्या अशा एखाद्या देणगीपेक्षा कितीतरी अधिक आहे. ते…

पुढे वाचा

चिंतन 160: पापस्वीकारातून लाभणारी दया

पापस्वीकार करण्यातला मोठा आनंद तुम्ही अनुभवला आहे का? काहींना पापस्वीकाराचा संस्कार आनंददायी वाटत नाही. उलट, तो त्यांना वेदनादायक आणि लाजिरवाणा अनुभव वाटतो. पण कदाचित काहींना प्रामाणिकपणे पापस्वीकार करताना वाटणाऱ्या लाजेची गरज असते…

पुढे वाचा

चिंतन 159: तुमच्या मृत्यूच्या घटकेला मिळणारी दया

‘नमो मरिये’ ही प्रार्थना आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा प्रत्येक वेळी आपण आपल्या मृत्यूच्या पवित्र घटकेसाठी प्रार्थना करतो.  अशा रीतीने ती घटका आपण आपल्या धन्य मातेकडे सोपवतो, जेणेकरून आपल्याला सर्वांत जास्त गरज असेल त्या क्षणी तिने आपल्यासाठी मध्यस्थी करावी.  त्या घटकेच्या तयारीसाठी म्हणण्यासारखी आणखी एक पवित्र प्रार्थना म्हणजे दैवी दयेची जपमाळ.  पुष्कळदा…

पुढे वाचा

चिंतन 158: तुमच्या बोलण्याचे विषय

तुम्ही रोज काय बोलता, यावरून तुमच्या आत्म्यात काय आहे, हे स्पष्ट दिसते. मग तुमच्या बोलण्यातून काय दिसून येते? दिवसभरात तुमचे बोलणे वरवरच्या आणि ऐहिक विषयांभोवतीच फिरत होते, असे अनेकदा तुमच्या लक्षात येईल. अशा काही हलक्याफुलक्या गप्पा…

पुढे वाचा

चिंतन 157: नैतिक निर्णय कसे घ्यावेत?

नैतिकदृष्ट्या योग्य निर्णय घेणे तुम्हाला कधी कठीण जाते का? आपल्या पतित मानवी स्वभावामुळे असे घडते. जीवनात आपण सहज गोंधळून जातो आणि देवाच्या मनात काय आहे व त्याची इच्छा काय आहे, हे आपल्याला समजेलच असे नाही. मग तुम्ही काय करावे? तुमची सदसद्विवेकबुद्धी हे एक पवित्र स्थान आहे, जिथे…

पुढे वाचा

चिंतन 156: प्रभू आपला आश्रय आहे

जीवनात कधी कधी मनात भीती शिरते. कदाचित तुमच्यासमोर एखादे अवघड काम असेल किंवा ज्या वाटेवर तुम्ही चालत आहात, तिथे पुढे काय असेल हे तुम्हाला माहीत नसेल. अशा आणि इतर अनेक अनुभवांमुळे मनात भीती आणि चिंता निर्माण होऊ शकतात. पुढे काय होईल हे माहीत नसल्याची भीती…

पुढे वाचा

चिंतन 155: कृपेच्या बळावर इतरांच्या दोषारोपांना सामोरे जाणे

एखाद्याने पुरेसा विचार न करता तुम्हाला दोषी ठरवणे, हा तुम्हाला येऊ शकणारा एक वेदनादायक अनुभव आहे. काही वेळा, ज्या कारणांवर तुमचे नियंत्रण नाही, अशा कारणांमुळे इतर लोक तुमच्याकडे दोषदृष्टीने आणि तुच्छतेने पाहतील. कदाचित ते तुमच्यातला एखादा किरकोळ दोष हेरतील आणि तो इतका मोठा करून दाखवतील की त्याच दोषाच्या नजरेतून ते…

पुढे वाचा