मराठी

चिंतन 154: शांत आणि नम्र आराधना

येशूच्या जन्माच्या वेळचे ते साधे दृश्य डोळ्यांसमोर आणा. आपली धन्य माता मरिया तिथे आहे. त्या क्षणी जनावरे जमत असत ती जागा सोडून तिला दुसरे घर नव्हते. तरी त्या पवित्र रात्रीच्या नीरव शांततेत, आपल्या बालकाकडे गाढ आराधनेने आणि प्रेमाने पाहताना तिला तिथे घरच्यासारखे वाटत होते. ती…

पुढे वाचा

चिंतन 153: आपले ‘लहानपण’ ओळखणे

लहान मुलांना मोठे होण्याची घाई असते. वाढदिवस आला की आपण एका वर्षाने मोठे झालो, याचा त्यांना खूप आनंद होतो. तरीही, लहान असल्यामुळे अनेक बाबतींत ती आपल्या आईवडिलांवर अवलंबून असतात. आध्यात्मिक जीवनात आपलेही असेच आहे. आपल्यालाही अनेकदा ‘मोठे व्हावे’ आणि…

पुढे वाचा

चिंतन 152: दुःखातून मिळणाऱ्या कृपेचे रहस्य

मानवी दुःख हे जीवनातील सर्वांत मोठ्या रहस्यांपैकी एक आहे. संत फॉस्टिनांची दैनंदिनी आणि आपल्या श्रद्धेची संपूर्ण आध्यात्मिक परंपरा दुःखाच्या या गहन रहस्यावर बराच प्रकाश टाकतात. सर्वप्रथम, निव्वळ लौकिक दृष्टिकोनातून पाहिले तर दुःख कोणालाही नकोसे वाटते. किंबहुना, ते कोणत्याही किंमतीत टाळण्याचा प्रयत्न केला जातो आणि ती सर्वांत मोठी शोकांतिका मानली जाते. पण ख्रिस्ती दृष्टिकोनातून पाहिले तर दुःखाचेच…

पुढे वाचा

चिंतन 151: आध्यात्मिक नाते

एखाद्या व्यक्तीशी खऱ्या अर्थाने जवळीक साधण्यासाठी आणि तिला सखोलपणे समजून घेण्यासाठी सतत बोलत राहणे आणि आपल्या मनातले व हृदयातले सारे काही सांगणे आवश्यक आहे का?  दोघांचेही आत्मे देवाशी घनिष्ठपणे जोडलेले असतील, तर तसे करण्याची गरज नाही.  अशा वेळी, आपल्यात असलेले…

पुढे वाचा

चिंतन 150: लोकांच्या मतांच्या सापळ्यात अडकू नका

इतर जण तुमच्याबद्दल काय विचार करतात, याला महत्त्व आहे का? दुसऱ्या शब्दांत, इतरांच्या “मतांची” तुम्ही चिंता करावी का? हो आणि नाही. नाही, कारण जे “मत” सत्य आहे, त्यालाच महत्त्व आहे. आणि देवाच्या मनात जे आहे, तेच सत्य आहे. आणि ते सत्य…

पुढे वाचा

चिंतन 149: अंतःकरणातील प्रेरणा

गरजूंपर्यंत देवाची दया पोहोचवण्याच्या असंख्य संधी आपल्या सभोवती आहेत. पण या संधी आपल्या नकळत सहज निसटून जातात. दैवी दयेचे साधन बनण्याचा एक प्रमुख मार्ग म्हणजे सतत लक्ष देण्याचा प्रयत्न करणे…

पुढे वाचा

चिंतन 148: शुद्धीस्थानातील आत्म्यांसाठी दया

एखादी प्रिय व्यक्ती मरण पावली की, ती आता स्वर्गात आहे आणि तिला आपल्या प्रार्थनांची गरज उरलेली नाही, असे आपण सहज गृहीत धरतो. पण आपल्या आधी या जगातून गेलेल्यांना आपण देऊ शकणाऱ्या सर्वांत मोठ्या भेटींपैकी एक म्हणजे आपली प्रार्थना. कृपेच्या अवस्थेत मरण पावणारी प्रत्येक व्यक्ती…

पुढे वाचा

चिंतन 147: कृती, शब्द आणि प्रार्थना यांद्वारे दया

देवाच्या अथांग दयेचे साधन व्हावे, अशी तुमची इच्छा आहे का?  असेल, तर तुम्ही तुमच्या कृती, शब्द आणि प्रार्थना यांद्वारे तसे होऊ शकता.  सर्वप्रथम, आपल्या कृतींतून दया दाखवण्याच्या संधींकडे तुम्ही सतत लक्ष ठेवले पाहिजे.  पण अनेकदा अशी संधी मिळाली (उदाहरणार्थ, एखाद्याला क्षमा करण्याची संधी), तरी आपण तिकडे पाठ फिरवतो…

पुढे वाचा

चिंतन 146: ख्रिस्ताच्या दुःखसहनाचे मनन करत प्रार्थना

आपल्या प्रभूच्या पवित्र दुःखसहनाविषयी आपणा सर्वांना माहीत आहे. पण त्याच्या दुःखसहनाकडे अंतःकरणापासून आणि प्रेमाने पाहणे थोड्यांनाच जमते. प्रार्थनेत आपण आपल्या प्रभूच्या दुःखसहनावर भक्तिभावाने मनन करायला शिकले पाहिजे. हे केवळ आपल्या प्रयत्नांनी साधण्याची गोष्ट नाही; उलट…

पुढे वाचा

चिंतन 145: प्रेमाच्या विस्मयात हरवून जाणे

प्रेमात पडल्यावर माणूस ‘मंत्रमुग्ध’ होऊ शकतो.  अशा मानवी प्रेमात तुम्ही काहीसे निःशब्द होऊ शकता. तुम्हाला नेमके काय वाटते, हे सांगण्याची गरज भासत नाही, किंबहुना ते सांगणे शक्यही वाटत नाही.  पण देवाचे प्रेम मानवी प्रेमाच्या कोणत्याही अनुभवापलीकडचे आहे. म्हणून जेव्हा त्याचा खोलवर…

पुढे वाचा