चिंतन 310: त्या दुष्टाचा मूर्खपणा
सैतान खरोखर आहे आणि तो घालतो ते मोहही खरे आहेत. तो तुमचा निखळ द्वेष करतो आणि तुमचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा आहे. हे जाणून घेणे तुमच्या हिताचे आहे. पण तो दुष्ट फार धूर्त आहे आणि कपटाने तुम्हाला आपल्या कह्यात आणू पाहतो. तो तुमच्याशी क्वचितच उघड उघड खोटे बोलतो, कारण अशा मोहाला तुम्ही बहुधा बळी पडणार नाही, हे त्याला माहीत आहे…
