मराठी

चिंतन 330: इतरांसाठी प्रार्थना

तुमच्या प्रार्थनेचे सामर्थ्य कमी लेखू नका. देवाच्या दयेवर तुमचा जितका अधिक भरवसा असेल, तितकी तुमची प्रार्थना ज्यांना तिची गरज आहे त्यांच्यासाठी अधिक प्रभावी ठरेल. प्रभूला सर्व काही माहीत आहे आणि कोणाला कशाची गरज आहे हेही तो जाणतो. पण त्याला आपली कृपा द्यायची आहे…

चिंतन 328: स्वर्ग

स्वर्ग आपल्याला अशा गौरवपूर्ण आणि परिपूर्ण जीवनाचे आमंत्रण देतो, जे आपल्या आकलनापलीकडचे आहे.  स्वर्गातही देवाचे आणि त्याच्या दयेचे गौरवशाली रहस्य आपल्याला पूर्णपणे समजणार नाही.  गौरवाने आणि कृपेने तेजस्वी झालेले संत स्वर्गातून आपल्याकडे प्रेमाने पाहतात…

चिंतन 327: देवाची गुप्त उपस्थिती

देव स्वतःला लपवतो. पण का? आपण त्याचा आस्थेने शोध घ्यावा, म्हणून तो गुप्ततेच्या आणि मौनाच्या पडद्याआड लपतो. जगात तुमचे लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींशी तो स्पर्धा करत नाही, कारण तुम्ही त्यालाच तुमच्या इच्छेचे एकमेव ध्येय मानावे, असे त्याला वाटते. तुमच्या हृदयात दडलेल्या देवाचा शोध घेण्याची ओढ बाळगा…

चिंतन 325: संतांवर विसंबून राहणे

ज्याने आपले संपूर्ण जीवन देवाला पूर्णपणे समर्पित केले, अशा एका जीवात्म्याची कल्पना करा. त्या जीवात्म्याने पावित्र्याचे शिखर गाठले आणि सांसारिक गोष्टींनी त्याला आपल्या मार्गापासून विचलित केले नाही. आयुष्यभर आपल्या प्रभूची सेवा करण्याचा आणि इतरांसाठी देवाच्या दयेचे साधन म्हणून सतत कार्य करण्याचा त्याने प्रयत्न केला. अनेक…

चिंतन 323: तुमचे अनन्य ध्येय

देव प्रत्येकाला एक अनन्य ध्येय देतो. काहींना लोकांसमोर वावरणारे जीवन जगण्याचे पाचारण मिळते, तर काहींना शांत आणि साधे जीवन जगण्याचे. काहींना आपल्या बुद्धीचा प्रभावीपणे उपयोग करण्याचे पाचारण मिळते, तर काहींना आपल्या हृदयाचा विशेष रीतीने उपयोग करण्याचे. पण देवाने प्रत्येकाला एक अनन्य ध्येय दिले आहे. तुमचे ध्येय काय…

चिंतन 313: झोप न येणाऱ्या रात्री

काही जणांना दररोज रात्री सहज झोप लागते आणि सकाळपर्यंत त्यांची झोप मोडत नाही. तर काही जणांना झोप लागण्यात फार अडचण येते. ही अडचण त्यांच्यासाठी मोठे ओझे ठरते आणि त्यांचे मन खचते. तुम्हालाही वारंवार किंवा क्वचित का होईना, झोपेचा त्रास होत असेल, तर या क्रुसाकडे पाहा…

चिंतन 299: मानवी शहाणपणातून येणारा थकवा

आपल्या प्रभूच्या हृदयातून उमटणारे सत्याचे शब्द आपल्या जीवनात आनंद आणतात आणि आपल्या आत्म्याला नवे बळ देतात. हे शब्द ऐकून तुम्ही ते मनापासून स्वीकारता आणि त्याप्रमाणे वागता, तेव्हा चुकीच्या धारणांच्या ओझ्यातून तुम्ही मुक्त होता आणि तुमच्या मनाला हलकेपणा व नवी ताजगी जाणवू शकते. मात्र…

चिंतन 298: निरर्थक कुजबुजीचा विषाणू

आपल्या पतित मानवी स्वभावातील एक दुर्दैवी प्रवृत्ती म्हणजे इतरांविषयी ‘कुजबुज’ करणे. ही कुजबुज विषाणूसारखी आहे: एकाने सुरुवात केली की ती झपाट्याने इतरांपर्यंत पसरते. आपल्या लक्षात येण्याआधीच अनेक जण खोट्या अफवा आणि वावड्या पसरवू लागतात, किंवा खऱ्या गोष्टीही प्रेमभाव न ठेवता सांगू लागतात. हे…

चिंतन 295: बाळ येशूची मिठी

आपला देव आपल्याला आपल्या पवित्र बाहूंमध्ये विसावू देतो, यावर प्रार्थनापूर्वक चिंतन करणे अगदी योग्य आहे. प्रेमाच्या या पवित्र मिठीतून स्वर्गीय पित्याचे दयाळू प्रेम समजून घेताना, तो पित्याच्या मायेने आपली कशी काळजी घेतो हे आपल्याला उमगते. येशूच्या कुशीत धाव घेतल्याने त्याच्या दयाळू प्रेमासाठी आपली अंतःकरणे खुली होतात. पण आणखी एक प्रतिमा…

चिंतन 292: विशेष पाचारणांचे मोल

काही जणांना संन्यस्त जीवनात प्रार्थनेत आणि एकांतात एक आगळे जीवन जगण्याचे पाचारण असते. विशेषतः काहींना एकांतवासी म्हणून किंवा मठाच्या एकांतात राहण्याचे पाचारण असते. हे पवित्र आत्मे जगापासून दूर राहतात आणि शांतपणे प्रार्थना व काम करण्यात आपले दिवस घालवतात. पण…