मराठी

चिंतन 320: उत्साही हृदय

जीवनात सर्वांत सहज जमणाऱ्या गोष्टींपैकी एक म्हणजे आळशीपणे दिवस घालवणे. कल्पना करा की तुमच्यावर कोणतीही जबाबदारी नाही, तुम्हाला हवी तेवढी संपत्ती तुमच्याकडे आहे आणि तुम्ही ऐषआरामात व निवांतपणे दिवस घालवू शकता. अशाने तुमचे हृदय फार आळशी होईल आणि फार उदासही होईल. विश्रांती घेणे चांगले आहे…

चिंतन 319: एकटेपणाला सामोरे जाताना

एकटेपणा ही अनेकांना सोसावी लागणारी खोल वेदना आहे. ती इतकी बोचते, याचे एक कारण म्हणजे एकटेपणा जाणवणाऱ्या व्यक्तीला ती वेदना एकट्यानेच सोसावी लागते. तिचे दुःख हलके करायला फार थोडी माणसे असतात, कधी तर कोणीच नसते. तसे नसते, तर त्या व्यक्तीला एकटेपणा जाणवला नसता. विशेष म्हणजे, ज्यांच्या भोवती इतर माणसे असतात त्यांनाही..

चिंतन 318: उदासीनता आणि विसरभोळेपणा

समजा, तुमचे लग्न झाले आहे आणि तुम्ही आपल्या जोडीदाराबद्दल अनेकदा उदासीन राहता. ही एक समस्या ठरेल. उदासीनता म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या भल्याची मनापासून काळजी न घेणे. विसरभोळेपणा हे उदासीनतेचे एक लक्षण आहे, कारण एखाद्या गोष्टीची फारशी काळजी नसली की तिचा सहज विसर पडतो. उदाहरणार्थ…

चिंतन 317: इतरांना दोषी ठरवणे

दुसऱ्याला दोषी ठरवणे फार सोपे असते, पण तसे करण्यापासून स्वतःला आवरणे फार कठीण असते. असे का? दुसऱ्याच्या अंतःकरणात काय आहे हे खरोखर माहीत नसतानाही तुम्ही इतक्या सहजपणे त्याला दोषी का ठरवता? या पापाची अनेक कारणे असू शकतात; त्यांपैकी एक…

चिंतन ३१६: प्रेमाची धगधगती ज्वाला

देवाच्या प्रेमाचे वर्णन करण्यासाठी आपण अनेक प्रतिमा वापरतो. त्यांपैकी एक म्हणजे “प्रेमाची धगधगती ज्वाला”. संत जॉन ऑफ द क्रॉस यांच्या “प्रेमाची जिवंत ज्वाला” या अभिजात आध्यात्मिक ग्रंथात ही प्रतिमा दिसते…

चिंतन 315: दया, दया आणि आणखी दया

देवाच्या दयेविषयी बोलण्याचा तुम्हाला कंटाळा येतो का? तेच ते पुन्हा सांगितले जाते आणि त्याचा मनावर काहीच ठसा उमटत नाही, असे तुम्हाला वाटते का? तसे असेल, तर दयेविषयी आणखी बोला आणि नव्या उत्साहाने तिच्यावर मनन करा. देवाच्या दयेचा तुम्हाला कधीही कंटाळा येऊ देऊ नका. देवाची दया इतकी महान आणि विपुल आहे की स्वर्गात तिचा अफाट विस्तार तुम्हाला स्पष्टपणे दिसेल. ती आपल्या आकलनापलीकडे आहे हे तुम्हाला उमगेल, आणि चिंतन करण्याचा तुम्हाला कधीही कंटाळा येणार नाही…

चिंतन 314: दया हे संरक्षणाचे भक्कम कवच

सैन्याला वेढा पडला की ते स्वतःचा बचाव करता येईल अशी जागा शोधते. ते लगेच एखादी उंच जागा किंवा आसरा आणि संरक्षण मिळेल असे ठिकाण शोधू लागते. तुझ्या आध्यात्मिक जीवनातही असेच असले पाहिजे. जेव्हा त्या दुष्टाचे बाण तुझ्यावर येतात किंवा जेव्हा जीवन…

चिंतन 313: झोप न येणाऱ्या रात्री

काही जणांना दररोज रात्री सहज झोप लागते आणि सकाळपर्यंत त्यांची झोप मोडत नाही. तर काही जणांना झोप लागण्यात फार अडचण येते. ही अडचण त्यांच्यासाठी मोठे ओझे ठरते आणि त्यांचे मन खचते. तुम्हालाही वारंवार किंवा क्वचित का होईना, झोपेचा त्रास होत असेल, तर या क्रुसाकडे पाहा…

चिंतन 312: खरे आणि विश्वासू मित्र

दुःख सोसणाऱ्या व्यक्तीशी मैत्री टिकवणे कठीण असते, विशेषतः तिचे दुःख दीर्घकाळ चालू राहते तेव्हा. एखादी व्यक्ती आजाराने किंवा इतर एखाद्या अडचणीने त्रस्त असते, तेव्हा सुरुवातीला अनेक मित्र तिच्या मदतीला येतात. पण जसजसा काळ जातो, तसतसे प्रेमाने तिच्या पाठीशी उभे राहणारे मित्र कमी होत जातात. यातून…

चिंतन 311: नम्रतेचे सत्य

नम्रता हा तेजस्वी सद्गुण समजून घेतला पाहिजे, त्यावर सतत चिंतन केले पाहिजे आणि तो सतत अंगीकारला पाहिजे. नम्रता म्हणजे काय? स्वतःविषयीचे सत्य जाणणे, ते सत्य मान्य करणे आणि त्यानुसार जगणे, एवढेच. तुमच्या सदसद्विवेकबुद्धीचा ठाव फक्त तुम्हाला आणि देवाला आहे. लोकांचे…