मराठी

चिंतन 303: मौन

आजच्या तंत्रज्ञानप्रधान जगात अनेकांना भेडसावणारा एक धोका म्हणजे सततचा गोंगाट. दिवसभर आपल्या कानांवर बोलण्याचा भडिमार होत राहतो. कधी रेडिओ, टीव्ही किंवा इंटरनेटवरून, तर कधी कुणाच्या अखंड बोलण्यातून. अगदी गाढ शांततेचे क्षण आपल्याला क्वचितच…

चिंतन 280: देवाकडे दुर्लक्ष करणे

तुम्ही देवाकडे दुर्लक्ष करता का? असे दुर्लक्ष अगदी सहज होते, म्हणूनच ते वारंवार घडते. पवित्र ख्रिस्तप्रसाद स्वीकारल्यानंतरही अनेकदा देवाकडे दुर्लक्ष होते. अनेकांना त्याला स्वीकारण्यासाठी पुढे येण्याची सवय लागते; पण त्या वेळी त्यांचे मन अनेक गोष्टींत भरकटते आणि या भेटीच्या पावित्र्याकडे त्यांचे फारसे लक्ष नसते…

चिंतन 279: तुमच्या अंतःकरणातील खात्री

तुमच्या आत्म्यात उमटणाऱ्या अंतरीच्या खात्रीतून देव तुमच्याशी काय बोलतो, ते ऐकण्याचा प्रयत्न करा. कधी देवाचा आवाज ठळक आणि स्पष्ट वाटेल, तर कधी तो क्षीण आणि संभ्रमात टाकणारा वाटेल. अनेक गोष्टींमुळे देवाच्या आवाजाकडे दुर्लक्ष होऊ शकते…

चिंतन 212: शंकेवर मात

‘शंका’ म्हणजे काय? शंका घेणे म्हणजे श्रद्धा नसणे; आणि श्रद्धा नसणे म्हणजे देवाने आपली इच्छा ज्या परिपूर्ण रीतीने प्रकट केली आहे त्यावर आणि त्याच्या योजनेवर भरवसा नसणे. सर्वांत आधी हे लक्षात घ्या: श्रद्धेच्या अभावातून शंका येते, याचा अर्थ तुम्ही देवाचे म्हणणे ऐकत नाही. जेव्हा आपण देवाविषयी, त्याच्या योजनेविषयी आणि तो आपल्याला जे काही प्रकट करतो त्याविषयी शंका घेतो, तेव्हा आपण…

चिंतन 149: अंतःकरणातील प्रेरणा

गरजूंपर्यंत देवाची दया पोहोचवण्याच्या असंख्य संधी आपल्या सभोवती आहेत. पण या संधी आपल्या नकळत सहज निसटून जातात. दैवी दयेचे साधन बनण्याचा एक प्रमुख मार्ग म्हणजे सतत लक्ष देण्याचा प्रयत्न करणे…

चिंतन १०८: ख्रिस्तसभेचा आवाज

देव संतांशी अनेक प्रकारे बोलला आहे. त्याने त्यांच्या अंतःकरणात दिलेल्या अनेक कृपादानांद्वारे आणि प्रेरणांद्वारेही तो त्यांच्याशी बोलला आहे. पण पवित्रतेचे सर्वोच्च शिखर गाठलेल्या गूढानुभवी व्यक्तीलाही अखेरीस देवाचा जो आवाज त्याच्या ख्रिस्तसभेद्वारे ऐकू येतो, त्यापुढे नम्रपणे मान तुकवावी लागते. ख्रिस्तसभा, विशेषतः…

चिंतन 101: इतरांच्या माध्यमातून देव बोलतो

तुम्हाला जो एखादा विशिष्ट संदेश ऐकण्याची गरज असते, तो देव अनेकदा तुम्हाला सांगू इच्छितो. मिस्सातील प्रवचन ऐकताना, एखादे पुस्तक वाचताना, रेडिओवर काही ऐकताना किंवा एखाद्या मित्राशी बोलताना एखादी गोष्ट खास तुमच्या लक्षात भरू शकते, पण तिचा परिणाम झालेला दिसत नाही…

चिंतन 64: देवाचा आवाज ऐकणे

तुम्ही चर्चमध्ये असता तेव्हा लक्ष देऊन ऐकता का? विशेषतः, तुम्ही देवाचा आवाज ऐकता का? अनेकदा आपण प्रवचन ऐकायला बसतो, पण आपले मन भरकटते आणि प्रवचनात सांगितलेले सगळेच किंवा त्यातले बरेचसे आपल्या कानावरून जाते. तुमचे मन कुठे भरकटते? खरे तर, कधीकधी मनाचे असे भरकटणे…

चिंतन 50: देवाचा स्वर ऐकणे

देव दिवसभर तुमच्याशी बोलत असतो, हे खरे आहे. तो तुम्हाला सतत त्याचे सत्य सांगत असतो, तुमच्या जीवनाला दिशा देत असतो आणि तुमच्यावर त्याची दया करत असतो. अडचण अशी की त्याचा स्वर अतिशय सौम्य आणि शांत असतो. का? कारण तुम्ही आपले संपूर्ण लक्ष त्याच्याकडे द्यावे, अशी त्याची इच्छा आहे. तो…

चिंतन 49: आपल्याविषयी होणारे गैरसमज

संत होण्यासाठी आपल्याला बोलावले आहे. त्या मार्गाने आपण चालू लागलो, तर वीरत्वाने सद्गुण आचरणात आणण्याचे आवाहनही आपल्याला केले जाईल. असे आचरण इतरांना नेहमीच समजेल असे नाही. खरे तर, जगाच्या शहाणपणाच्या दृष्टीने सद्गुणांचे असे वीरत्वपूर्ण आणि पवित्र आचरण म्हणजे मूर्खपणा. पण आपण…