मराठी

चिंतन 64: देवाचा आवाज ऐकणे

छायाचित्र: रॉबर्ट शाएब, स्रोत: पिक्साबे

व्हिडिओ

तुम्ही चर्चमध्ये असता तेव्हा लक्ष देऊन ऐकता का? विशेषतः, तुम्ही देवाचा आवाज ऐकता का? अनेकदा आपण प्रवचन ऐकायला बसतो, पण आपले मन भरकटते आणि प्रवचनात सांगितलेले सगळेच किंवा त्यातले बरेचसे आपल्या कानावरून जाते. तुमचे मन कुठे भरकटते? खरे तर, कधीकधी भरकटल्यासारखे वाटणारे आपले मन प्रभूच दुसरीकडे वळवत असतो. कधी मिस्साबलीत एखादी गोष्ट सांगितली जाते आणि तुम्ही तिच्यावर चिंतन करावे म्हणून आपला प्रभू ती तुमच्या अंतःकरणात ठेवतो. मिस्साबलीत असताना किंवा एकांतात प्रार्थना करताना येशूला तुम्हाला आध्यात्मिक प्रवासाला घेऊन जाऊ द्यायला घाबरू नका. तुमच्या आत्म्याला थेट प्रवचन द्यावे, अशी त्याची अनेकदा इच्छा असू शकते (पाहा दैनंदिनी #221).

आज तुम्ही किती चांगल्या प्रकारे चिंतन करता, याचा विचार करा. खरे प्रार्थनामय चिंतन म्हणजे केवळ दिवास्वप्न पाहणे नव्हे. त्यात मन भरकटून आपण या ना त्या गोष्टीच्या विचारात अडकत नाही किंवा तिची चिंता करत बसत नाही. प्रार्थनामय चिंतनात आपण आपली कल्पनाशक्ती देवाच्या हाती सोपवतो, जेणेकरून तो आपल्याला आपल्या सत्याकडे नेईल. त्या क्षणी आपल्याला समजण्याची गरज असलेल्या एखाद्या विशिष्ट सत्यवचनाकडे आपल्याला न्यावे, अशी त्याची अनेकदा इच्छा असते. हे तुम्हाला कितपत जमते? प्रार्थनेत तुम्ही कसे चिंतन करता, याचा विचार करा. पुढच्या वेळी प्रार्थना करताना तिची सूत्रे देवाच्या हाती द्यायला घाबरू नका.

हे प्रभू, तू रात्रंदिवस माझ्याशी बोलतोस, हे मला ठाऊक आहे. तुझा मधुर आवाज मला ऐकू येऊ दे आणि तो लक्षपूर्वक ऐकायला मला मदत कर. माझ्या प्रार्थनेची सूत्रे तुझ्या हाती सोपवायला मला मदत कर आणि तुला जे काही सांगायचे आहे ते सारे समजून घेण्यासाठी मला मार्गदर्शन कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

चौदाव्या दिवसाची चिंतने:
वाळवंटातील 40 दिवस & क्रुसापाशी 40 दिवस

प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य

प्रायश्चित्तकाळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतने

दैवी दयेवरील आणखी चिंतने

सुवार्तेवरील दैनंदिन चिंतन

आजचे संत व सण