मराठी

चिंतन 101: इतरांच्या माध्यमातून देव बोलतो

प्रतिमा: जुनिफर बाया (पिक्साबे)

व्हिडिओ

तुम्हाला जो एखादा विशिष्ट संदेश ऐकण्याची गरज असते, तो देव अनेकदा तुम्हाला सांगू इच्छितो. मिस्सातील प्रवचन ऐकताना, एखादे पुस्तक वाचताना, रेडिओवर काही ऐकताना किंवा एखाद्या मित्राशी बोलताना एखादी गोष्ट खास तुमच्या लक्षात भरू शकते, पण इतरांवर तिचा तसा परिणाम झालेला दिसत नाही. या प्रेरणेकडे लक्ष द्या. ती देवाने त्याच्या दयेतून तुम्हाला दिलेली देणगी आहे आणि तिच्यातून तुमच्यावरचे त्याचे प्रेम प्रकट होते (पाहा दैनंदिनी #456).

अलीकडे ज्या एखाद्या गोष्टीने तुमचे लक्ष वेधले, तिच्यावर चिंतन करा. एखादी गोष्ट ऐकताना ती जणू खास तुमच्यासाठीच सांगितली गेली आहे, असे तुम्हाला वाटले का? एखादा विचार सतत तुमच्या मनात येत आहे का? तसे असेल, तर त्या विचारावर थोडा वेळ चिंतन करा. तो विचार प्रभूकडून आला आहे का आणि त्यातून प्रभू तुम्हाला काय सांगत असेल, हे ओळखण्याचा प्रयत्न करा. कदाचित देव स्वतः तुमच्याशी बोलत असेल आणि हे त्याच्या अपार दयेचे एक कृत्य असेल.

हे प्रभू, तुझा आवाज ऐकण्याची माझी इच्छा आहे. तू मला जे सांगतोस, त्याकडे लक्ष देण्यास मला मदत कर. तू बोलतोस तेव्हा तुझे म्हणणे ऐकून उदार मनाने आणि प्रेमाने तुला प्रतिसाद देण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

नववा दिवस: दैवी दयेच्या रविवारच्या तयारीसाठी नोव्हेना

11 एप्रिल – संत स्तानिस्लाउस, धर्माध्यक्ष आणि रक्तसाक्षी
(हा दिवस ईस्टरच्या अष्टकात येत असल्यामुळे यंदा त्यांचा उपासनेतील स्मृतिदिन साजरा केला जात नाही.)

पास्का काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतने

दैवी दयेवरील आणखी चिंतने

सुवार्तेवरील दैनंदिन चिंतन

आजचे संत आणि सण