मराठी

चिंतन 293: स्वतःच्या नजरेत शून्य होणे

स्वतःच्या नजरेत आपण काहीच नाही, हे उमगण्यात तुम्हाला काही मोल वाटते का? कदाचित नाही. हे शब्द स्वीकारणे कठीण जाते, कारण देवाच्या कृपेच्या विशेष दानानेच नम्रतेचा पूर्ण अर्थ उमगतो. काही प्राचीन तत्त्वज्ञ तर गर्वालाच मोठा सद्गुण मानतात आणि नम्रतेला…

चिंतन 292: विशेष पाचारणांचे मोल

काही जणांना संन्यस्त जीवनात प्रार्थनेत आणि एकांतात एक आगळे जीवन जगण्याचे पाचारण असते. विशेषतः काहींना एकांतवासी म्हणून किंवा मठाच्या एकांतात राहण्याचे पाचारण असते. हे पवित्र आत्मे जगापासून दूर राहतात आणि शांतपणे प्रार्थना व काम करण्यात आपले दिवस घालवतात. पण…

चिंतन 289: आत्म्यांच्या तारणाची तळमळ

आपल्या हृदयातील इच्छांकडे पाहता, कोणती इच्छा सर्वांत ठळकपणे जाणवते? तुम्हाला आकर्षित करणाऱ्या अनेक गोष्टी नक्कीच आहेत. अनेक ऐहिक लाभ आणि सुखे सहजच तुमच्या आकांक्षांचा केंद्रबिंदू बनू शकतात. शारीरिक सुख, पैसा आणि ऐहिक यश यांच्या इच्छा सर्वांत प्रबळ इच्छांपैकी आहेत…

चिंतन 286: नम्रता, पवित्रता आणि देवावरील प्रेम

आपल्या धन्य मातेच्या हृदयाला सर्वांत प्रिय काय आहे? तिने तुम्हाला दर्शन दिले आणि तुमच्यासाठी तिच्या मनात असलेली सर्वांत मोठी इच्छा सांगितली, तर ती कोणती असेल? कदाचित देवाने तिला तुमच्या जीवनातील एखाद्या विशिष्ट गरजेची जाणीव करून दिली असेल; पण त्याशिवाय…

चिंतन 283: पापावर मात करणे

देवाच्या दयेचा संदेश इतका साधा आहे की या पुस्तकातील अनेक पानांवर किंवा संत फॉस्टिनाच्या दैनंदिनीवर चिंतन केल्यानंतरही तो आपल्या लक्षात येईलच असे नाही. देवाच्या दयेच्या संदेशातून हे साधे सत्य आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजे: आपली पापे कबूल करण्याची आपल्याला कसलीही भीती वाटू नये…

चिंतन 281: देवाची अढळ इच्छा

कधी कधी देवावर आपले गाढ प्रेम असते, तेव्हा त्याच्यासाठी मोठी कार्ये करण्याची प्रबळ प्रेरणा आपल्याला वाटते. तरीही, आपली इच्छा आणि दृढ निश्चय असूनही, देव आपले कार्य पुढे जाऊ देत नाही, असे वाटू शकते. याचे कारण कदाचित असे असेल की प्रभू अजून…

चिंतन 280: देवाकडे दुर्लक्ष करणे

तुम्ही देवाकडे दुर्लक्ष करता का? असे दुर्लक्ष अगदी सहज होते, म्हणूनच ते वारंवार घडते. पवित्र ख्रिस्तप्रसाद स्वीकारल्यानंतरही अनेकदा देवाकडे दुर्लक्ष होते. अनेकांना त्याला स्वीकारण्यासाठी पुढे येण्याची सवय लागते; पण त्या वेळी त्यांचे मन अनेक गोष्टींत भरकटते आणि या भेटीच्या पावित्र्याकडे त्यांचे फारसे लक्ष नसते…

चिंतन 278: देवाच्या दयेची रहस्ये उलगडणाऱ्या खिडक्या

येशूच्या हृदयातून दयेचे किरण झळकत आहेत, अशी त्याची प्रतिमा चित्रकाराकडून रंगवून घेण्यास संत फॉस्टिनाला सांगण्यात आले. तिने तसे केले आणि या प्रतिमेद्वारे अनेक आत्मे आपल्याकडे आकर्षित होतील, असे येशूने तिला आश्वासन दिले. येशू आणि संत फॉस्टिना यांनी या प्रतिमेला दिलेल्या महत्त्वाचा विचार करणे उद्बोधक आहे…

चिंतन 273: लौकिक बंध नकोत, केवळ देवावर प्रेम

देवाशी असलेले आपले नाते जेव्हा सर्वोच्च टप्प्यावर पोहोचते, तेव्हा इतर सर्व लौकिक बंध गळून पडतात. त्यामुळे उत्कटतेने आणि दृढ निश्चयाने देवाकडे धाव घेताना आपल्याला कशाचाही अडथळा राहत नाही. या जीवनातील प्रत्येक आसक्तीतून आपण मुक्त झाले पाहिजे, जेणेकरून आपली निष्ठा केवळ देवाशी आणि त्याच्या पवित्र…

चिंतन 272: हृदयातील भाव बाह्य जीवनात कसे प्रकट होतात

तुमचे हृदय तुम्हाला आणि देवालाच दिसते; इतर कोणालाही ते दिसत नाही. तुमच्या अंतर्जीवनातील प्रत्येक तपशील देवाला पूर्णपणे माहीत आहे; पण तुम्हाला ते तपशील पूर्णपणे कळत नाहीत. तरीही, तुमच्या अंतर्जीवनाच्या वास्तवाची जाणीव अधिकाधिक होत जाणे महत्त्वाचे आहे. पाहा…