मराठी

चिंतन 357: कृपेच्या प्रेरणा

एखादी व्यक्ती व्याकुळ असते तेव्हा तुम्ही कदाचित तिच्याशी बोलणे टाळता. तिच्याशी बोलण्यात आपला बराच वेळ आणि शक्ती खर्च होईल, असे सहज वाटू शकते. पण तुमच्या संवादाला प्रभू दिशा देत असेल, तर तो थोड्याच वेळात अद्भुत गोष्टी घडवू शकतो. अर्थात, असेही काही प्रसंग असतात…

चिंतन 356: तुमच्या हृदयाची धडधड

जीवनात एखाद्या गोष्टीचा उत्साह वाटला की तुमच्या हृदयाची धडधड वाढते. ही एक स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. म्हणून तुमचे हृदय कधी देवासाठी धडधडते का, याचा विचार करणे चांगले आहे. देवाच्या उपस्थितीने जागणाऱ्या पवित्र आदरयुक्त विस्मयात तुम्ही स्वतःला हरवू देता का? तुम्हाला…

चिंतन 352: ताडन आणि अपराधभावना

देवाच्या ताडनाचा विचार करणे कदाचित सुखावह नसेल. पण त्याचे ताडन खरे आहे आणि ते त्याच्या विपुल दयेची कृती आहे, हे समजून घेतले पाहिजे. जेव्हा आत्मे देवापासून दूर जातात आणि त्याची दया नाकारतात, तेव्हा त्याच्या हृदयाला खोल जखम होते. त्यामुळे देव…

चिंतन 350: आराधनेतील सौंदर्य

जग सुंदर आहे आणि त्यातून देवाचे सौंदर्य प्रकट होते; पण पवित्र युकरिस्तासारखी आध्यात्मिक सत्ये त्याहून कितीतरी सुंदर आहेत.  परमपवित्र युकरिस्तात उपस्थित असलेल्या देवाचे सौंदर्य पाहण्यासाठी श्रद्धेची दृष्टी हवी.  हे सौंदर्य अधिक स्पष्टपणे पाहता यावे, यासाठी आराधना हा एक उत्तम मार्ग आहे.  स्वीकारणे जरी…

चिंतन 349: अंतःकरणाची शांती गमावणे

तुमच्या अंतःकरणातील शांती आणि स्वस्थता हिरावून घेण्याची ताकद कशात आहे? तुमचा अपमान झाला, तुमची खिल्ली उडवली गेली, तुमच्याविषयी चुकीचा निर्णय दिला गेला, तुम्हाला तुरुंगात डांबले, मारहाण केली किंवा अगदी ठार मारले, तर काय? यापैकी कोणतीही गोष्ट तुमच्या अंतःकरणातील देवाची शांती हिरावून घेऊ शकेल का? तुम्ही तसे होऊ दिले तरच. हे तुम्हाला ठाऊक असणे आणि त्यावर तुमचा विश्वास असणे अत्यावश्यक आहे…

चिंतन 345: देवामध्ये तल्लीन होणे

तुम्ही कधी देवामध्ये तल्लीन झाला आहात का?  बहुतेकांना असा अनुभव क्वचितच येतो, तर कित्येकांना तो कधीच येत नाही.  देवामध्ये तल्लीन होणे, म्हणजे प्रार्थनेत इतके खोलवर बुडून जाणे की त्याच्या सान्निध्यात आपण हरवून गेलो आहोत असे वाटते.  असे घडते तेव्हा प्रभू तुम्हाला पूर्णपणे आपल्या अधीन करतो…

चिंतन 342: ख्रिस्ताच्या दुःखसहनातून लाभणारा विसावा

सहसा आपण “दुःखसहन” आणि “विसावा” हे शब्द एकत्र वापरत नाही. ख्रिस्ताच्या दुःखसहनातून विसावा कसा लाभू शकतो? मानवी नजरेतून पाहिले तर त्यात केवळ भय आणि दुःखच दिसते. प्रभूने अपार यातना सोसल्या आणि आपल्या धन्य मातेनेही त्याच्यासोबत त्या सोसल्या, तेही अत्यंत दुःखी…

चिंतन 339: निर्मळ आत्मा

हे कदाचित लगेच लक्षात येणार नाही, पण ज्या आत्म्याचे देवावर निर्मळ प्रेम असते, त्याची अनेकांना भीती वाटते. त्यांना वाटणारी ‘भीती’ म्हणजे अशा आत्म्याला विरोध करण्याची भीती. दुष्ट हेतू असलेले लोक अशा व्यक्तीवर हल्ला करण्याचे धाडस करणार नाहीत, कारण तो हल्ला त्यांच्यावरच उलटू शकतो, हे त्यांना माहीत असते. हे अशक्य आहे…

चिंतन 336: जगाची संपत्ती… की देव?

आपल्याला किती वेळा ऐहिक वस्तूंची हाव वाटते, हे विचार करण्यासारखे आहे. जगातली सारी संपत्ती एकट्या तुमच्या मालकीची झाली, तरी ती तुमच्या हृदयाची आस पूर्ण करू शकणार नाही. तुमच्या अंतःकरणातील पोकळी भरून काढू शकतो तो केवळ प्रभू आणि त्याची पवित्र इच्छा. दुसरे काहीही पुरेसे नाही…