मराठी

चिंतन 286: नम्रता, पवित्रता आणि देवावरील प्रेम

आपल्या धन्य मातेच्या हृदयाला सर्वांत प्रिय काय आहे? तिने तुम्हाला दर्शन दिले आणि तुमच्यासाठी तिच्या मनात असलेली सर्वांत मोठी इच्छा सांगितली, तर ती कोणती असेल? कदाचित देवाने तिला तुमच्या जीवनातील एखाद्या विशिष्ट गरजेची जाणीव करून दिली असेल; पण त्याशिवाय…

चिंतन 281: देवाची अढळ इच्छा

कधी कधी देवावर आपले गाढ प्रेम असते, तेव्हा त्याच्यासाठी मोठी कार्ये करण्याची प्रबळ प्रेरणा आपल्याला वाटते. तरीही, आपली इच्छा आणि दृढ निश्चय असूनही, देव आपले कार्य पुढे जाऊ देत नाही, असे वाटू शकते. याचे कारण कदाचित असे असेल की प्रभू अजून…

चिंतन 279: तुमच्या अंतःकरणातील खात्री

तुमच्या आत्म्यात उमटणाऱ्या अंतरीच्या खात्रीतून देव तुमच्याशी काय बोलतो, ते ऐकण्याचा प्रयत्न करा. कधी देवाचा आवाज ठळक आणि स्पष्ट वाटेल, तर कधी तो क्षीण आणि संभ्रमात टाकणारा वाटेल. अनेक गोष्टींमुळे देवाच्या आवाजाकडे दुर्लक्ष होऊ शकते…

चिंतन 273: लौकिक बंध नकोत, केवळ देवावर प्रेम

देवाशी असलेले आपले नाते जेव्हा सर्वोच्च टप्प्यावर पोहोचते, तेव्हा इतर सर्व लौकिक बंध गळून पडतात. त्यामुळे उत्कटतेने आणि दृढ निश्चयाने देवाकडे धाव घेताना आपल्याला कशाचाही अडथळा राहत नाही. या जीवनातील प्रत्येक आसक्तीतून आपण मुक्त झाले पाहिजे, जेणेकरून आपली निष्ठा केवळ देवाशी आणि त्याच्या पवित्र…

चिंतन 267: न्याय की दया?

देवाच्या न्यायाविषयी आणि त्याच्या दयेविषयी बोलणे योग्य आहे. न्याय आणि दया एकमेकांच्या विरोधात नाहीत. ज्या देवदूतांनी देवाची सेवा करण्यास नकार दिला, त्यांचा त्याने न्याय केला; त्याचप्रमाणे जे पश्चात्ताप करून देवाकडे वळण्यास नकार देतात, त्यांचाही तो न्याय करील. पण सध्या देव दयाळू आहे, असे म्हणणे अधिक योग्य आहे. खरे तर…

चिंतन 266: पवित्रतेच्या ध्येयासमोर येणारी निराशा

तुम्हाला संत व्हायचे आहे का? तुमचे उत्तर “हो” असेल, अशी आशा आहे. पण तुम्ही संत होऊ शकता, असे तुम्हाला वाटते का? या प्रश्नाचे उत्तर देणे कदाचित अधिक कठीण असेल. पवित्र होण्याचे स्वप्न पाहणे आणि तशी इच्छा बाळगणे सोपे आहे…

चिंतन 264: येशूसोबत आध्यात्मिक साधना

तुम्ही कधी आध्यात्मिक साधनेत सहभागी झाला आहात का?  काहींना जीवनाच्या धावपळीतून बाजूला होऊन आपल्या प्रभूचे म्हणणे ऐकण्यासाठी आणि त्याच्या दयामय सान्निध्यात बराच वेळ घालवण्याची संधी मिळते.  तर काहींना अशा साधनेसाठी एक दिवस काढणेही कठीण जाते.  तरीही…

चिंतन 262: प्रेमाचा नियम की न्यायाचा नियम?

देवाच्या हातातून आपण निसटू शकत नाही.  तोच विश्वाचा आधार आहे आणि सर्व गोष्टींचे अस्तित्व टिकवून ठेवतो.  त्याची सततची काळजी नसती, तर आपले अस्तित्वच उरले नसते.  पण आपला सांभाळ करणाऱ्या त्याच्या हाताखाली आपण दोनपैकी एका प्रकारे राहतो.  आपल्याला एकतर ‘प्रेमाचा नियम’ मार्ग दाखवतो किंवा ‘न्यायाचा नियम’.  …

चिंतन 258: देवाची जवळीक

देव कुठे आहे? देव स्वर्गात किंवा कुठेतरी दूर आहे, तिथून तो आपल्याकडे पाहतो आणि आपल्या पवित्र इच्छेनुसार संपूर्ण सृष्टीला दिशा देतो, असे सहज वाटू शकते. हे खरे आहे, पण हे संपूर्ण चित्र नाही. देव पूर्णपणे ‘सर्वातीत’ आहे, म्हणजेच तो आपल्या आणि साऱ्या सृष्टीच्या कितीतरी पलीकडे आहे. पण तो…

चिंतन 257: देवाची दीर्घकालीन योजना

तुम्ही मनापासून आपल्या प्रभूची सेवा करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा त्या त्या दिवशी त्याची काय इच्छा आहे, हे तो तुम्हाला सांगत असल्याचे जाणवू शकते. ते अगदी स्पष्ट नसेल, तरी तुम्ही अमुक एखादी गोष्ट करावी अशी त्याची इच्छा आहे, असे तुम्हाला जाणवू शकते. तुमच्या जीवनासाठी देवाने आखलेली संपूर्ण योजना तो सहसा तुम्हाला एकाच वेळी…