मराठी

चिंतन 225: प्रार्थनेतून आध्यात्मिक मैत्री

देवाची दया आपल्यापर्यंत पोहोचण्याचे एक प्रभावी माध्यम म्हणजे मैत्री. पण मैत्रीच्या नात्याची खोली नेहमी सारखी नसते. कधी हे नाते वरवरच्या आणि क्षुल्लक गोष्टींवर आधारलेले असते, तर कधी त्याची मुळे आपल्या प्रभूमध्ये खोलवर रुजलेली असतात…

चिंतन 151: आध्यात्मिक नाते

एखाद्या व्यक्तीशी खऱ्या अर्थाने जवळीक साधण्यासाठी आणि तिला सखोलपणे समजून घेण्यासाठी सतत बोलत राहणे आणि आपल्या मनातले व हृदयातले सारे काही सांगणे आवश्यक आहे का?  दोघांचेही आत्मे देवाशी घनिष्ठपणे जोडलेले असतील, तर तसे करण्याची गरज नाही.  अशा वेळी, आपल्यात असलेले…

चिंतन 134: आपल्या सामूहिक श्रमांची गोडी

मधमाशी दिवसेंदिवस मेहनत करते. वसाहतीतल्या सगळ्या मधमाश्या निसर्गतः एकाच उद्देशाने काम करतात. त्या मध तयार करतात. हे काही सोपे काम नाही. थोडासा मध तयार करण्यासाठीही हजारो मधमाश्यांना सतत श्रम करावे लागतात. पण शेवटी त्यांच्या श्रमांचे फळ मिळते…

चिंतन 75: इतरांमध्ये ख्रिस्ताची भेट

पवित्र परमप्रसाद खरोखरच पवित्र आहे. आपण त्याची भक्तिभावाने आराधना करतो आणि तो अत्यंत आदराने हाताळतो. आपण आपल्या प्रभूला कधीही फेकून देणार नाही, जमिनीवर टाकणार नाही किंवा त्याचा अनादर होईल अशा कोणत्याही ठिकाणी टाकून देणार नाही. तरीही, आपण येशूला दाखवतो तितक्याच आदराने इतरांशी वागण्यात अनेकदा कमी पडतो…

चिंतन 67: प्रेमाची गुप्त गुलाबफुले

प्रेमाच्या काही कृती एकमेकांवर प्रेम करणाऱ्या दोघांपुरत्याच असतात. अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि स्वतःला अर्पण करण्याच्या कृती म्हणजे त्या दोघांच्या नात्यात गुप्तपणे दिल्या-घेतल्या जाणाऱ्या प्रेमाच्या अनमोल भेटी. देवावरच्या आपल्या प्रेमालाही हे लागू होते. आपले अतिशय खोल प्रेम व्यक्त करण्याचे मार्ग आपण नियमितपणे शोधले पाहिजेत…

चिंतन 65: येशू माझा स्वामी

येशूला आपला स्वामी म्हणणे तुम्हाला सहज वाटते का? काहींना त्याला “मित्र” किंवा “मेंढपाळ” म्हणणे अधिक आवडेल. ही दोन्ही संबोधने योग्यच आहेत. पण त्याला स्वामी म्हणण्याबद्दल काय वाटते? आपण सर्वांनी आपल्या प्रभूला आपल्या जीवनाचा स्वामी मानून स्वतःला त्याच्या स्वाधीन करावे. आपण केवळ सेवक होऊन थांबू नये…

चिंतन 54: इतरांसाठी प्रार्थना

आपल्या ओळखीतील प्रत्येक जण स्वर्गात जाईल, असे गृहीत धरणे सोपे आहे.  अर्थात, आपण अशी आशा बाळगली पाहिजे.  पण स्वर्गप्राप्तीसाठी अंतःकरणात खरे परिवर्तन घडले पाहिजे.  स्वर्गात प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती आपले जीवन ख्रिस्ताला अर्पण करण्याचा आणि पापापासून दूर वळण्याचा वैयक्तिक निर्णय घेतल्यामुळेच तिथे पोहोचते.  कशी…

चिंतन 36: आध्यात्मिक मैत्रीतून लाभणारी दया

कधीकधी जीवन कठीण वाटते. आपले आध्यात्मिक जीवन कोरडे झाले आहे किंवा ते आपल्याला पेलवत नाही, असे वाटू शकते. आपल्या पापांवर मात करणे आपल्या आवाक्याबाहेरचे वाटू शकते. देवाशी आपले नाते जोपासणेही फार कठीण वाटू शकते. पण हे सारे अनुभव अशी कृपादाने आहेत की ती…

चिंतन 338: गुपित जपणे

कोणी आपल्याला विश्वासाने सांगितलेली गोष्ट गुप्त ठेवणे, ही त्या व्यक्तीवर प्रेम करण्याची एक रीती आहे.  कोणी अडचणीत किंवा संभ्रमात असताना आपल्याकडे येते आणि सांगितलेली गोष्ट आपल्यापुरतीच ठेवायला सांगते, असा अनुभव आपल्या सर्वांनाच आला आहे.  अशा प्रकारचे पवित्र गुपित तुम्ही जपू शकता का?  इतरांनी विश्वासाने सांगितलेली गोष्ट गुप्त ठेवणे, ही त्यांच्याशी दयाळूपणे वागण्याची एक सुंदर रीती आहे.  जर…