छायाचित्र: थॉमस, स्रोत: पिक्साबे
येशूला आपला स्वामी म्हणणे तुम्हाला सहज वाटते का? काहींना त्याला “मित्र” किंवा “मेंढपाळ” म्हणणे अधिक आवडेल. ही दोन्ही संबोधने योग्यच आहेत. पण त्याला स्वामी म्हणण्याबद्दल काय वाटते? आपण सर्वांनी आपल्या प्रभूला आपल्या जीवनाचा स्वामी मानून स्वतःला त्याच्या स्वाधीन करावे. आपण केवळ सेवक होऊन थांबू नये; आपण गुलाम झाले पाहिजे. ख्रिस्ताचे गुलाम. हे तुम्हाला खटकत असेल, तर आपला प्रभू कसा स्वामी असेल, याचा विचार करा. त्याच्या आज्ञा परिपूर्ण प्रेमातून येतात आणि त्यांच्याद्वारे तो आपल्याला मार्ग दाखवतो. तो परिपूर्ण प्रेमाचा देव आहे. म्हणून अशा पवित्र आज्ञाधारकतेने स्वतःला त्याच्या हाती सोपवताना आपल्याला कसलीही भीती वाटू नये (पाहा दैनंदिनी #228).
आज ख्रिस्ताला स्वतःला पूर्णपणे समर्पित करण्यात आणि सर्वस्वी त्याच्या मार्गदर्शनाखाली जगण्यात जो आनंद आहे, त्यावर चिंतन करा. आपला प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कृती त्याच्या परिपूर्ण योजनेचे पालन करणारी असावी, याचा विचार करा. अशा स्वामीची आपल्याला किंचितही भीती वाटू नये, एवढेच नव्हे, तर आपण त्याच्याकडे धाव घ्यावी आणि पूर्ण आज्ञाधारकपणे जगण्याचा प्रयत्न करावा.
हे प्रभू, तू माझ्या जीवनाचा स्वामी आहेस. प्रेमाच्या या पवित्र गुलामगिरीत मी माझे जीवन तुझ्या स्वाधीन करतो. या पवित्र गुलामगिरीत, तुझ्या इच्छेप्रमाणे जगण्यास आणि प्रेम करण्यास तू मला मुक्त केलेस, म्हणून मी तुझे आभार मानतो. तुझ्या सर्वथा परिपूर्ण इच्छेनुसार तू मला आज्ञा देतोस, म्हणून मी तुझे आभार मानतो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
पंधराव्या दिवसाची चिंतने:
वाळवंटातील 40 दिवस & क्रुसापाशी 40 दिवस
प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य
प्रायश्चित्तकाळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतने




