मराठी

चिंतन 220: व्याकूळ आत्मा

काही जणांना आपल्या आत्म्याच्या गाभ्यात तीव्र यातना जाणवतात. कधी या यातना पापामुळे होतात, तर कधी देवाच्या एका विशेष दयेमुळे आत्म्याला येशूने सोसलेल्या यातनांचा अनुभव घेता येतो. कारण काहीही असो, जर तुम्हाला…

चिंतन 214: पूर्ण क्षमा

कल्पना करा की तुम्ही एका गंभीर गुन्ह्यात दोषी ठरलात आणि तुम्हाला जन्मठेप होणार होती. तुम्ही केलेल्या कृत्याचा तुम्हाला पश्चात्ताप झाला आणि तुम्ही आपला गुन्हा पूर्णपणे कबूल केला. शिक्षा सुनावण्याच्या दिवशी तुम्हाला कोठडीतून हातकड्या घालून न्यायालयात आणले गेले. लवकरच पुन्हा कोठडीत जावे लागेल, हे तुम्हाला माहीत होते. पण त्याऐवजी न्यायाधीशांनी…

चिंतन 209: पापाच्या सवयीवर मात करणे

पापावर मात करण्यासाठी देवाची दया आवश्यक आहे. अनेकदा आपण केवळ स्वतःच्या प्रयत्नांनी पापावर मात करू पाहतो. पण ही धडपड व्यर्थ आहे, कारण केवळ स्वतःच्या प्रयत्नांनी तुम्ही तुमच्या पापावर कधीही मात करू शकणार नाही. ज्या पापाशी तुम्ही झगडत आहात, त्यातून मुक्त होण्याचा एकच मार्ग आहे, आणि…

चिंतन 208: दयेचा आध्यात्मिक बाण

सामान्यतः बाण जखमी करतो आणि जीव घेतो.  इतिहासभर युद्धासाठी आणि शिकारीसाठी बाणांचा वापर झाला आहे.  पण दयेचा आध्यात्मिक बाण अगदी वेगळा आहे.  शिमोन संदेष्ट्याने आपल्या धन्य मातेला सांगितलेले शब्द आठवा: “आणि तुझ्याही अंतरातून तलवार आरपार जाईल” (लूक 2:35).  आणि…

चिंतन 204: तुमच्या आत्म्याचे पुष्पदलावरण

फुलाचे पुष्पदलावरण म्हणजे उमलू पाहणाऱ्या पाकळ्यांभोवती असलेले पानासारखे बाह्य आवरण. पाकळ्या वाढत असताना ते त्यांचे रक्षण करते. नाजूक पाकळ्यांना वाढण्यासाठी ते जणू एखाद्या ‘पाळणाघरा’सारखी जागा देते. या आडोशात पाकळ्या वाढतात आणि पुष्पदलावरण त्यांना सुरक्षित ठेवते. त्या पूर्ण वाढल्या की पुष्पदलावरण उघडते…

चिंतन 200: प्रेम आणि दुःख यांचे ऐक्य

प्रेम आणि दुःख एकमेकांच्या विरुद्ध आहेत का? म्हणजेच, तुम्ही तीव्र दुःख अनुभवत असतानाही तुमच्या हृदयात अपार प्रेम असू शकते का? यासाठी एका प्रश्नाचा विचार करा: तुमच्या दुःखाचे मूळ कशात आहे? ते तुमच्या पापामुळे आहे का? दुसऱ्या एखाद्या व्यक्तीबद्दल वाटणाऱ्या करुणेतून ते येते का? त्यामागे एखादी शारीरिक किंवा मानसिक…

चिंतन 199: येशूशी ऐक्य म्हणजे इतरांशी ऐक्य

अनेक कारणांनी चर्च गौरवशाली आहे. तिच्यात आढळणारे ऐक्य हे तिच्या गौरवाचे एक अंग आहे. कधीकधी तिच्यात पुष्कळ फूट पडते, अनेकांना दुखापत होते आणि नानाविध प्रकारचा विस्कळीतपणा दिसतो, हे खरे आहे. पण हे चर्चचे गुणधर्म नाहीत. हे पापांचे परिणाम आहेत…

चिंतन 197: मला तहान लागली आहे

“मला तहान लागली आहे.” या साध्या उद्गारांत किती गहन अर्थ दडला आहे! आपल्या प्रभूने क्रूसावरून हे उद्गार काढले. एका सैनिकाने त्याची तहान शमवण्यासाठी द्राक्षारसापासून बनलेल्या शिऱ्यात भिजवलेला स्पंज त्याला देऊन थोडा दिलासा देण्याचा प्रयत्न केला. द्राक्षारसाचा झालेला शिरका हा अशा आत्म्याचे प्रतीक आहे, जो…

चिंतन १९१: बोलका आत्मा

सतत बोलावेसे वाटणे हा देवाशी एकरूप होऊन जगण्याच्या आंतरिक जीवनाला खरा धोका आहे. बोलणे हे पाप नाही; उलट, अनेकदा ते दुसऱ्याप्रती दयेचे कृत्य असते. पण कधी कधी अतिबोलकेपणा देवाची दया प्रकट होण्याच्या आड येतो. बोलणे हे मुळात…

चिंतन 190: सारी सृष्टी देवाचा गौरव करते

सर्व गोष्टी एकाच अंतिम हेतूने निर्माण केल्या आहेत: परमपवित्र त्रैक्याची स्तुती करणे आणि गौरव करणे. आपल्यालाही नेमके याच हेतूसाठी निर्माण केले आहे—याहून अधिक नाही, कमी नाही, आणि इतर कोणत्याही हेतूसाठी नाही. मानव म्हणून आपल्याला असे जीवन जगण्याचे आवाहन आहे, की आपल्या आराधनेतून केवळ आपणच करू शकतो अशी देवाची स्तुती आणि गौरव व्हावा…