मराठी

चिंतन 329: आनंदाने पापस्वीकार करणे

तुम्हाला पापस्वीकाराची भीती का वाटते? आपल्या प्रभूच्या कोमल हृदयातून हा गौरवशाली संस्कार तुम्हाला देऊ केला जातो. या गौरवशाली देणगीद्वारे येशू तुमच्या खांद्यावरची ओझी दूर करतो, जेणेकरून तुम्हाला त्याच्या दयेत अधिक पूर्णपणे सहभागी होता येईल. हे तुम्हाला उमगले असते तर…

चिंतन 300: आपल्या आत्म्यात दडलेली गुपिते उघड करणे

ज्याच्यापाशी आपल्या मनातल्या अगदी खोलवरच्या गोष्टी मोकळेपणाने सांगता येतात, अशी एखादी व्यक्ती असणे खरोखरच दिलासादायक असते. तुम्ही सांगितलेले पूर्णपणे गुप्त ठेवणारी आणि तुमच्याशी दयेने व समजूतदारपणे वागणारी अशी विश्वासू व्यक्ती लाभणे हा मोठा आशीर्वाद आहे. अगदी आपल्या पापांविषयीही निःसंकोचपणे बोलणे…

चिंतन 298: निरर्थक कुजबुजीचा विषाणू

आपल्या पतित मानवी स्वभावातील एक दुर्दैवी प्रवृत्ती म्हणजे इतरांविषयी ‘कुजबुज’ करणे. ही कुजबुज विषाणूसारखी आहे: एकाने सुरुवात केली की ती झपाट्याने इतरांपर्यंत पसरते. आपल्या लक्षात येण्याआधीच अनेक जण खोट्या अफवा आणि वावड्या पसरवू लागतात, किंवा खऱ्या गोष्टीही प्रेमभाव न ठेवता सांगू लागतात. हे…

चिंतन 283: पापावर मात करणे

देवाच्या दयेचा संदेश इतका साधा आहे की या पुस्तकातील अनेक पानांवर किंवा संत फॉस्टिनाच्या दैनंदिनीवर चिंतन केल्यानंतरही तो आपल्या लक्षात येईलच असे नाही. देवाच्या दयेच्या संदेशातून हे साधे सत्य आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजे: आपली पापे कबूल करण्याची आपल्याला कसलीही भीती वाटू नये…

चिंतन 265: आवेगांचा धोका आणि आशीर्वाद

देवाने आपल्याला निर्माण करतानाच आवेग दिले. ख्रिस्ती जीवनाच्या वाटचालीत हे आवेग मोठे आशीर्वाद ठरू शकतात किंवा मोठे सापळे बनू शकतात. प्रत्येक आवेगाला कोणती गोष्ट चालना देते, यावर हे सारे अवलंबून आहे. उदाहरणार्थ, रागाचा आवेग चांगल्या किंवा वाईट कामासाठी वापरता येतो. जेव्हा राग आपला ताबा घेतो आणि त्या रागाचे मूळ…

चिंतन 241: आपल्या विशिष्ट पापांवर उपाय

तुम्ही आपल्या पापांवर मात कशी कराल?  प्रत्येक पाप वेगळे असते आणि त्याची आसक्ती सुटावी म्हणून त्यासाठी विशिष्ट प्रार्थना व त्याग आवश्यक असतात.  देहवासनेची, क्रोधाची आणि गर्वाची पापे ही तीन सामान्य प्रकारची पापे आहेत.  यांपैकी प्रत्येक पापावर मात करता येते, पण त्यासाठी विशेष…

चिंतन 234: गाढ श्रद्धेतील अस्पष्टता

सहसा श्रद्धेचा प्रवास सुरू करताना अनेक गोष्टींचा नव्याने बोध होतो आणि कितीतरी सत्ये उलगडतात.  श्रद्धाजीवनाचे विविध पैलू जिवंत होतात आणि जीवनातील अनेक रहस्ये समजू लागतात…

चिंतन 228: देवाची अढळ उपस्थिती

देव तुमच्या जीवनात जिवंत आहे का?  तो तुमच्यामध्ये वास करतो का?  रात्रंदिवस तुमच्या हृदयाच्या अगदी गाभ्यात तो तुमच्यासोबत असतो का?  एकाच गोष्टीमुळे देव तुमच्यापासून दूर जाऊ शकतो, आणि ती म्हणजे मरणपाप…

चिंतन 223: एक भयावह दिवस

जीवनात कोणतीही गोष्ट भयावह असलीच पाहिजे असे नाही. आपण सोसत असलेला कितीही मोठा संघर्ष आणि दुःख देव सहजपणे आपल्या दयेचे आणि आपल्या पवित्रीकरणाचे साधन बनवू शकतो…

चिंतन 214: पूर्ण क्षमा

कल्पना करा की तुम्ही एका गंभीर गुन्ह्यात दोषी ठरलात आणि तुम्हाला जन्मठेप होणार होती. तुम्ही केलेल्या कृत्याचा तुम्हाला पश्चात्ताप झाला आणि तुम्ही आपला गुन्हा पूर्णपणे कबूल केला. शिक्षा सुनावण्याच्या दिवशी तुम्हाला कोठडीतून हातकड्या घालून न्यायालयात आणले गेले. लवकरच पुन्हा कोठडीत जावे लागेल, हे तुम्हाला माहीत होते. पण त्याऐवजी न्यायाधीशांनी…