मराठी

चिंतन 204: तुमच्या आत्म्याचे पुष्पदलावरण

फुलाचे पुष्पदलावरण म्हणजे उमलू पाहणाऱ्या पाकळ्यांभोवती असलेले पानासारखे बाह्य आवरण. पाकळ्या वाढत असताना ते त्यांचे रक्षण करते. नाजूक पाकळ्यांना वाढण्यासाठी ते जणू एखाद्या ‘पाळणाघरा’सारखी जागा देते. या आडोशात पाकळ्या वाढतात आणि पुष्पदलावरण त्यांना सुरक्षित ठेवते. त्या पूर्ण वाढल्या की पुष्पदलावरण उघडते…

चिंतन 184: पुरोहितांच्या सेवाकार्यातून लाभणारी दया

नाही, पुरोहित परिपूर्ण नाहीत.  त्यांच्याकडूनही दिवसेंदिवस पापे घडतात.  इतर सर्व माणसांप्रमाणेच त्यांनाही दैनंदिन जीवनात सतत पश्चात्ताप करण्याची आणि देवाकडे वळण्याची गरज असते.  तरीही ते पुरोहित आहेत.  आणि त्यांच्या पवित्र पुरोहिताभिषेकामुळे प्रभू त्यांच्याद्वारे स्पष्टपणे बोलतो, तरी…

चिंतन 179: अंतर्मनातील उदासीला सामोरे जाताना

“प्रभू देतो आणि प्रभूच काढून घेतो…” (ईयोब 1:21).  हे किती खरे आहे!  जीवनात असे काही क्षण येतात जेव्हा देवाकडून आपल्याला भरभरून सांत्वन मिळते.  कुटुंबात मोठा आनंद असतो तेव्हा किंवा एखाद्या व्यक्तीचे निरपेक्ष प्रेम आपल्याला अनुभवायला मिळते तेव्हा असे घडू शकते.  कधी कधी…

चिंतन 178: केवळ स्वतःच्या बळावर पवित्रता कधीच साधता येत नाही

तुम्हाला पवित्र जीवन जगण्याची आकांक्षा आहे का? असेल, तर केवळ स्वतःच्या बळावर तुम्हाला ते साधता येणार नाही. तुम्हाला दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची, किंबहुना अनेकांची मदत लागते. इतरांकडून प्रेमळ मार्गदर्शन मिळावे म्हणून प्रभूने आपल्यासाठी अनेक मार्ग खुले केले आहेत. काही जणांना अनेक वर्षांपासून एका आध्यात्मिक मार्गदर्शकाचे मार्गदर्शन लाभते…

चिंतन 160: पापस्वीकारातून लाभणारी दया

पापस्वीकार करण्यातला मोठा आनंद तुम्ही अनुभवला आहे का? काहींना पापस्वीकाराचा संस्कार आनंददायी वाटत नाही. उलट, तो त्यांना वेदनादायक आणि लाजिरवाणा अनुभव वाटतो. पण कदाचित काहींना प्रामाणिकपणे पापस्वीकार करताना वाटणाऱ्या लाजेची गरज असते…

चिंतन 111: सैतानाचे खोटे बोल

सैतान आपल्याला अनेक प्रकारे मोहात पाडतो. आपल्यावर हल्ला करण्याची त्याची एक नेहमीची युक्ती म्हणजे आपल्याला आपल्या पापांची आठवण करून देणे. आपण कबूल केलेल्या पापांचीही तो आठवण करून देतो. आपण चुकीच्या मार्गावर आहोत, देव आपल्यावर प्रसन्न नाही आणि आपण खोटारडे व पापी आहोत, असे आपल्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करायला त्याला आवडते. आणि…

चिंतन 107: पापस्वीकारात आपला आत्मा उघड करणे

देव आपल्या याजकांना त्याचे प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे पाठवतो. याजक परिपूर्ण नसले, तरी ते देवाचे प्रतिनिधी आहेत. समेटाच्या संस्कारात ही गोष्ट विशेषतः खरी ठरते. आपण या संस्कारासाठी जाणे अत्यावश्यक आहे…

चिंतन 80: आपल्या मृत्यूच्या घटकेला

तुम्ही ‘नमो मरिये’ ही प्रार्थना म्हटली असेल, तर या जगातील तुमच्या शेवटच्या घटकेसाठीही तुम्ही प्रार्थना केली आहे: “आता आणि आमच्या मृत्यूच्या घटकेला आमच्यासाठी प्रार्थना कर.”  अनेकांना मृत्यूची भीती वाटते, आणि आपल्या मृत्यूच्या घटकेचा विचार करावासा सहसा आपल्याला वाटत नाही.  पण…