मराठी

चिंतन 308: आईचे प्रेम

या जगातील कोणतीही प्रतिमा देवाचे परिपूर्ण प्रेम पूर्णपणे प्रकट करू शकत नाही, हे खरे आहे. देव या सृष्टीच्या पलीकडे आहे आणि त्याचे प्रेम या जगाच्या कक्षेत मावणारे नाही. तरीही या जगात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या देवाच्या प्रेमाची विविध अंगे उलगडून दाखवतात. आईचे प्रेम ही अशीच एक प्रतिमा आहे. जरी…

चिंतन 297: निसर्गाकडून मिळणारे धडे

संपूर्ण सृष्टीत देवाचे वैभव आणि त्याचे कार्य प्रतिबिंबित होऊ शकते. विश्वामागे देवाचे ज्ञान आहे. तो विश्वाचे सर्व नियम सुव्यवस्थित करतो आणि सर्व गोष्टींना योग्य दिशा देतो. निसर्गाच्या नियमांत प्रतिबिंबित होणारे कृपेचे नियम समजून घेण्यासाठी आपण फक्त थोडा वेळ निसर्गाच्या नियमांचे चिंतन केले पाहिजे. उदाहरणार्थ…

चिंतन 258: देवाची जवळीक

देव कुठे आहे? देव स्वर्गात किंवा कुठेतरी दूर आहे, तिथून तो आपल्याकडे पाहतो आणि आपल्या पवित्र इच्छेनुसार संपूर्ण सृष्टीला दिशा देतो, असे सहज वाटू शकते. हे खरे आहे, पण हे संपूर्ण चित्र नाही. देव पूर्णपणे ‘सर्वातीत’ आहे, म्हणजेच तो आपल्या आणि साऱ्या सृष्टीच्या कितीतरी पलीकडे आहे. पण तो…

चिंतन 190: सारी सृष्टी देवाचा गौरव करते

सर्व गोष्टी एकाच अंतिम हेतूने निर्माण केल्या आहेत: परमपवित्र त्रैक्याची स्तुती करणे आणि गौरव करणे. आपल्यालाही नेमके याच हेतूसाठी निर्माण केले आहे—याहून अधिक नाही, कमी नाही, आणि इतर कोणत्याही हेतूसाठी नाही. मानव म्हणून आपल्याला असे जीवन जगण्याचे आवाहन आहे, की आपल्या आराधनेतून केवळ आपणच करू शकतो अशी देवाची स्तुती आणि गौरव व्हावा…

चिंतन 187: वादळानंतरचे इंद्रधनुष्य

सृष्टी स्वतः देवाचा महिमा कसा प्रकट करते आणि श्रद्धेविषयी आपल्याला कशी शिकवते, हे पाहणे विलक्षण आहे. इंद्रधनुष्याचेच उदाहरण घ्या. ते तेजस्वी, सुंदर, रंगीबेरंगी आणि विस्मयचकित करणारे असते. इंद्रधनुष्य पाहून प्रत्येकाला आनंद होतो. पण पाऊस किंवा वादळ नसते, तर इंद्रधनुष्यही नसते. जीवनही असेच आहे. आपण…

चिंतन 176: जगाच्या पापाशी संघर्ष

देव जगाकडे पाहतो तेव्हा त्याला काय दिसते? त्याला आपल्या सृष्टीचे सौंदर्य, आपल्या योजनेतील परिपूर्ण सुव्यवस्था आणि आपल्या पुत्रकन्यांची उपस्थिती नक्कीच दिसते. पण असंख्य पापांचे भयानक स्वरूपही त्याला दिसते. अगदी लहानसे पापही…

चिंतन 55: सृष्टीत देवाच्या दयेचे प्रतिबिंब दिसते

कल्पना करता येईल अशा सर्वांत सुंदर सूर्यास्ताचा विचार करा. संध्याकाळी अथांग समुद्रावर सूर्यास्ताची झळाळी पसरली आहे आणि आकाश रंगांनी उजळून निघाले आहे.  किंवा निरभ्र निळ्या आकाशाला भेदून जाणाऱ्या भव्य पर्वतशिखरांचा विचार करा, अथवा उंचावरून प्रचंड वेगाने कोसळणाऱ्या धबधब्याचा.  या साऱ्या देणग्या…

चिंतन ३: देवदूतांची निर्मिती—दयेची एक कृती

देवाने भौतिक जग निर्माण केले, तसेच आध्यात्मिक जगही शून्यातून निर्माण केले. देवदूत आणि प्रत्येक मानवी आत्मा या देवाच्या शुद्ध प्रेमाच्या देणग्या आहेत. आध्यात्मिक जग निर्माण करताना देवाने जाणण्याची आणि प्रेम करण्याची क्षमता असलेले जीव निर्माण केले. देवदूतांची निर्मिती…

चिंतन 2: सृष्टीनिर्मिती—देवाच्या दयेचे कृत्य

दैवी दया अधिक सखोलपणे समजून घेण्याच्या तयारीसाठी आपण देवाच्या पहिल्या देणगीपासून सुरुवात करूया: जगाची निर्मिती. देवाने आपल्या चांगुलपणातून शून्यातून जग निर्माण केले. शून्यातून सर्व काही निर्माण करण्याच्या या कृत्यातून आपल्याला काही अंशी हे उमगते की सृष्टी ही…

चिंतन 353: गौरवाचे स्तोत्र

संगीतातून देवाच्या सृष्टीतील नैसर्गिक नियमांचा शोध लागतो आणि ते नियम व्यक्तही होतात. सृष्टीच्या रचनेत असलेल्या क्रम आणि लयीवर संगीत आधारलेले असते. काही संगीत सृष्टीतील या नैसर्गिक व्यवस्थेचा उपयोग लौकिक गोष्टींचा गौरव करण्यासाठी करते. संगीताचे काही प्रकार तर पाप आणि अव्यवस्थाही व्यक्त करतात. पण…