बार्तोलोमे एस्तेबान मुरियो, सार्वजनिक मालकीतील कलाकृती, विकिमीडिया कॉमन्समार्फत
इतरांची सेवा करण्याची क्षमता हा आपल्याला मिळालेल्या सर्वांत मोठ्या आशीर्वादांपैकी एक आहे. आपण अनेक प्रकारे त्यांची सेवा करतो, विशेषतः आपापल्या जीवनपाचारणाला अनुसरून. पण देवाच्या दयेचे सेवक बनून एखाद्या व्यक्तीला स्वर्गाच्या वैभवाकडे नेणे, हीच आपण त्या व्यक्तीची करू शकणारी सर्वांत मोठी सेवा आहे. असंख्य आत्म्यांना देवावरील प्रेमात वाढण्याची प्रेरणा आपण दिली, या जाणिवेने स्वर्गातील आनंद कसा असेल, याची कल्पना करा. हा तुमच्या जीवनातील सर्वांत मोठ्या आशीर्वादांपैकी एक आणि एक मोठा बहुमान आहे, असे माना (पाहा दिनदर्शिका #1622).
आपल्या देवाचे सत्य, प्रेम आणि करुणा इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही किती आतुर आहात? ही किती मोठ्या सन्मानाची गोष्ट आहे आणि तिच्यामुळे तुम्हाला किती मोठी प्रतिष्ठा लाभते, हे तुम्हाला जाणवते का? जीवनात या कार्याला सर्वोच्च प्राधान्य देणे किती महत्त्वाचे आहे, याबद्दल कधीही शंका बाळगू नका. संपूर्ण अंतःकरणाने आणि सर्वस्वाने देवावर प्रेम करणे हे प्रथम येते; त्याखालोखाल इतरांची सेवा करणे आणि तारणाच्या वाटेवर त्यांना मदत करणे येते. दयेच्या या गौरवशाली कार्यासाठी आजच स्वतःला वाहून घ्या. असे केल्याबद्दल तुम्ही अनंतकाळ कृतज्ञ राहाल.
हे प्रभू, इतरांची मनापासून सेवा करण्याची इच्छा आणि दृढ संकल्प मला दे. त्यांच्यावर प्रेम करण्यास आणि तुझी दया व करुणा त्यांच्या जीवनात आणण्यास मला मदत कर. हे प्रिय प्रभू, माझ्या जीवनाद्वारे तू त्यांना देत असलेल्या कृपेमुळे अनेक आत्मे तुझ्यासाठी जिंकले जावोत. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
थँक्सगिव्हिंगनिमित्त देणगी देण्याचा तुम्ही विचार कराल का?
मरीयेच्या निष्कलंक गर्भधारणेची नोवेना
29 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर
संत आंद्रेयांची नाताळची नोव्हेना
परंपरेनुसार, संत आंद्रेयांच्या नाताळच्या नोव्हेनेची प्रार्थना 30 नोव्हेंबरला, संत आंद्रेयांच्या सणापासून, नाताळच्या पूर्वसंध्येपर्यंत दररोज 15 वेळा म्हटली जाते




