मराठी

चिंतन 14: खरे समाधान केवळ दयेतूनच

‘व्यभिचार करताना पकडलेली स्त्री’ — चित्रकार: ग्वेर्चिनो

व्हिडिओ

जीवनात आपण कितीतरीदा जगातल्या क्षणभंगुर गोष्टींमध्ये समाधान शोधतो. धनसंपत्ती असो, देहसुख असो, प्रतिष्ठा असो वा आणखी काही—केवळ एकाच गोष्टीत खरे समाधान मिळते, हे आपण ओळखले पाहिजे. आपण ज्याच्या शोधात आहोत, ती देवाची दैवी दया आहे. बाकी सर्व म्हणजे समाधानाचा केवळ भास. इतर गोष्टींनी आपल्या आत्म्याचे समाधान करण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या अंतःकरणात दुःख, व्याकुळता आणि भ्रमनिरास उरेल. देवाची दया आपल्याला सतत साद घालत राहते आणि आपण त्या सादेला प्रतिसाद देईपर्यंत आपल्याला एक गोड वेदना देत राहते (पाहा: दैनंदिनी #8).

देवाच्या दयेऐवजी इतर कशातही समाधान शोधण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुमच्या आत्म्याला जी ‘गोड वेदना’ होते, तिच्यावर चिंतन करा. ती ‘गोड’ आहे, कारण त्या वेदनेतून देव आपल्याला प्रेमाने समज देतो आणि केवळ त्याच्या दयेवर भरवसा ठेवण्यास बोलावतो. ती ‘वेदनादायक’ आहे, कारण देवाचे नाही अशा कोणत्याही गोष्टीची आसक्ती आपल्या आत्म्याला अस्वस्थ करते, हे आपण स्वतःला स्पष्टपणे पाहू दिले पाहिजे. देवाच्या दयेपलीकडे ज्या ज्या गोष्टींना आपण चिकटून राहतो, त्या शेवटी आपल्याला ओझेच वाटतील.

हे प्रभू, जे काही तुझे नाही त्यापासून दूर वळण्याची तुझ्या दयेची हाक मला अंतःकरणात जाणवू दे आणि अनुभवू दे. प्रत्येक बाबतीत तुझ्या दयेकडे धाव घेण्यास आणि शेवटी मला दबवून टाकणाऱ्या, वेदना देणाऱ्या व ओझे ठरणाऱ्या गोष्टींपासून दूर वळण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

पहिल्या वहीवरील चिंतनांची प्रस्तावना वाचा

दैवी दयेवरील आणखी चिंतने

सुवार्तेवरील दैनंदिन चिंतन

आजचे संत व सण