मराठी

चिंतन 68: इतरांच्या चांगुलपणात आनंद मानणे

छायाचित्र: रॉबर्ट शेइब, स्रोत: पिक्साबे

व्हिडिओ

इतरांनी काही चांगले केले, तर तुमची प्रतिक्रिया काय असते? एखाद्या मुलाने काही चांगले केले, तर बहुधा तुम्हाला मनापासून आनंद होतो. पण इतरांच्या बाबतीत काय? इतरांच्या चांगल्या कृतींत मनापासून आनंद मानता येणे, ही दयाळू हृदयाची खात्रीची खूण आहे. हेवा आणि मत्सर अनेकदा अशा प्रकारे दया व्यक्त करण्याच्या आड येतात. पण जेव्हा आपल्याला दुसऱ्याच्या चांगुलपणाचा आनंद होतो आणि एखाद्याच्या जीवनात देव कार्य करत असल्याचे पाहून आपण आनंदित होतो, तेव्हा ते आपल्या दयाळू हृदयाचे लक्षण असते (पाहा दैनंदिनी #241).

ज्या व्यक्तीची प्रशंसा करणे आणि तिला मान देणे तुम्हाला कठीण जाते, तिचा विचार करा. कोणाचे कौतुक करणे आणि कोणाला प्रोत्साहन देणे तुम्हाला कठीण वाटते? असे का होते? अनेकदा आपण त्या व्यक्तीच्या पापाकडे बोट दाखवतो; पण खरे कारण आपले स्वतःचे पाप असते. तो राग, हेवा, मत्सर किंवा गर्व असू शकतो. महत्त्वाचे हे की इतरांच्या सत्कृत्यांत आनंद मानण्याची वृत्ती आपण जोपासली पाहिजे. अशा रीतीने जिच्यावर प्रेम करणे तुम्हाला कठीण जाते, अशा किमान एका व्यक्तीचा विचार करा आणि आज तिच्यासाठी प्रार्थना करा. प्रभू इतरांद्वारे कार्य करतो तेव्हा तुम्हाला आनंद मानता यावा, म्हणून त्याच्याकडे दयाळू हृदय मागा.

हे प्रभू, इतरांमध्ये तुझी उपस्थिती ओळखायला मला मदत कर. माझ्या मनातला सारा गर्व, हेवा आणि मत्सर सोडून तुझ्या दयाळू हृदयाने प्रेम करायला मला मदत कर. इतरांच्या जीवनातून तू अनेक प्रकारे कार्य करतोस, त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. मोठ्यातल्या मोठ्या पापी व्यक्तीच्या जीवनातही तू कार्य करतोस, हे मला पाहू दे. आणि तुझी उपस्थिती मला जाणवेल तेव्हा माझे हृदय अशा आनंदाने भरून टाक की तो खऱ्या कृतज्ञतेतून व्यक्त होईल. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

सतराव्या दिवसाची चिंतने:
वाळवंटातील 40 दिवस & क्रुसापाशी 40 दिवस

9 मार्च – रोमची संत फ्रान्सिस, व्रतस्थ

प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य

प्रायश्चित्तकाळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतने

दैवी दयेवरील आणखी चिंतने

सुवार्तेवरील दैनंदिन चिंतन

आजचे संत / सण