मराठी

चिंतन 111: सैतानाचे खोटे बोल

छायाचित्र: unsplash.com वरून

व्हिडिओ

सैतान आपल्याला अनेक प्रकारे मोहात पाडतो. आपल्यावर हल्ला करण्याची त्याची एक नेहमीची युक्ती म्हणजे आपल्याला आपल्या पापांची आठवण करून देणे. आपण कबूल केलेल्या पापांचीही तो आठवण करून देतो. आपण चुकीच्या मार्गावर आहोत, देव आपल्यावर प्रसन्न नाही आणि आपण खोटारडे व पापी आहोत, असे आपल्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करायला त्याला आवडते. आपण पापी आहोत हे खरे असले, तरी सैतान आपल्या पापांकडे देवाच्या दयेच्या दृष्टीने कधीच पाहत नाही. त्याच्या फसव्या मोहांवर मात करण्यासाठी, तो आपल्याला आपल्या पापांची आठवण करून देतो तेव्हा आपण फक्त येशूच्या हृदयातील दयेचे स्मरण करावे. त्याच्या हृदयाकडे पाहताना आपले पाप कबूल करण्याची भीती आपल्याला वाटणार नाही. सैतानाची इच्छा असली तरी, अशा प्रामाणिक कबुलीमुळे आपल्या मनात चिंता, निराशा किंवा शंका निर्माण होणार नाहीत. उलट, देवाच्या दयेच्या प्रकाशात आपल्या पापाला सामोरे गेल्याने आपल्याला नवी उमेद मिळेल आणि आपले मन आशेने भरून जाईल (पाहा दैनंदिनी #520).

तुमच्या पापांमुळे तुम्ही निराश व्हावे म्हणून सैतान तुम्हाला कोणकोणत्या प्रकारे भुलवू शकतो, याचा विचार करा. आपल्या पापांबद्दल दुःख करणे चांगले आणि हिताचे आहे; पण त्यामुळे कधीही निराश होऊ नका. ख्रिस्ती भावनेने केलेला शोक तुम्हाला देवाच्या दयेकडे नेतो. या पवित्र कृतीत तुम्हाला होणारा मनापासूनचा पश्चात्ताप तुमचे ओझे हलके करतो आणि तुमचे मन आनंदाने भरून टाकतो.

हे प्रिय प्रभू, सैतानाच्या कपटापासून आणि हल्ल्यांपासून मला मुक्त कर. हे देवा, माझे रक्षण कर आणि तुझ्या अपार दयेचा मला कधीही विसर पडू देऊ नकोस. तुझी दया मला दिसते तेव्हा, दररोज माझ्या पापांचा पश्चात्ताप करून तुझ्याकडे वळण्यास मला मदत कर, म्हणजे सैतानाच्या दुष्टपणाची सारी शस्त्रे त्याच्या हातून हिरावली जातील. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

21 एप्रिल – कँटरबरीचे संत अ‍ॅन्सेल्म, बिशप आणि चर्चचे धर्मपंडित

पास्का काळातील प्रार्थना

पास्का काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतने

दैवी दयेवरील आणखी चिंतने

सुवार्तेवरील दैनंदिन चिंतन

आजचे संत आणि सण