दयाळू येशूची चमत्कारिक प्रतिमा आणि संत फॉस्टिनाची समाधी असलेले प्रार्थनालय — छायाचित्र: इंग्लंड आणि वेल्समधील कॅथलिक चर्च, परवाना: CC BY-NC-ND 2.0
येशूच्या हृदयातील दया तेजाने झळकते. संत फॉस्टिनाला दैवी दयेचे असेच दर्शन घडले. आपल्या प्रभूच्या उघड्या हृदयातून प्रकाशाचा आणि कृपेचा ओघ जगावर उसळून आला. आपला प्रकाश जगावर असाच पडत राहावा, अशी येशूची इच्छा आहे. त्याला तुमच्या हृदयात विसावायचे आहे, जेणेकरून तुमच्याद्वारे त्याचा प्रकाश इतरांवर पडेल (पाहा: दैनंदिनी #514).
तुमच्या हृदयात काय आहे? कटुता आणि वेदना आहेत का? पाप आणि अंधार आहे का? की आपल्या प्रभूचे हृदय आहे? येशू तुमच्या हृदयात वास करतो का? या प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरे देणे फार महत्त्वाचे आहे. येशूचे हृदय तुमच्या हृदयात विसावले आहे, असे तुम्हाला प्रामाणिकपणे म्हणता येत नसेल, तर ही जाणीव महत्त्वाची आहे; तिच्यावर चिंतन करा. त्याच्या हृदयाला तुमच्यातील पाप विरघळवू द्या आणि अंधार दूर करू द्या. त्यांच्या जागी त्याचा प्रकाश उजळू द्या. जेव्हा येशूचे हृदय तुमच्या हृदयात विसावेल, तेव्हा तुमच्या हृदयातून दयेचे किरण पसरतील आणि इतरांना त्या किरणांत न्हाऊ घालतील.
हे प्रभू, मी माझ्या हृदयात डोकावतो तेव्हा कधी कधी मला तिथे पाप आणि अंधार दिसतात. माझ्या हृदयात येऊन वास कर, सारा अंधार दूर कर आणि सर्व पाप पुसून टाक. माझे हृदय तुझ्या ताब्यात घेताना तुझ्या दैवी दयेचे किरण माझ्यावर आणि तुझ्या दयेची गरज असलेल्या जगावर पसरू दे. हे प्रिय प्रभू, मी माझे हृदय तुला अर्पण करतो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
पास्का काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतने




