लुका कांबियासो, CC0, विकिमीडिया कॉमन्समार्फत
आपण करू शकणारी सर्वश्रेष्ठ प्रार्थना म्हणजे “अर्पणाची प्रार्थना.” अर्पणाची प्रार्थना म्हणजे वधस्तंभावरील ख्रिस्ताच्या एकमेव बलिदानाशी एकरूप होऊन पित्याला केलेले बलिदान. आपण स्वतःला केवळ आपल्या बळावर अर्पण करत नाही. ख्रिस्त येशूशी एकरूप होऊन आपण स्वतःला अर्पण करतो. नेमके सांगायचे तर, आपल्या प्रार्थना, उपवास, देहदमन आणि रोजची कामे आपण देवाला अर्पण केली पाहिजेत. दररोज प्रार्थना करा. उपवास व इतर प्रकारच्या आत्मत्यागाने आपल्या शारीरिक इच्छांवर नियमितपणे संयम ठेवा. आपली सर्व रोजची कामे देवाला दिलेली भेट म्हणून आणि त्या त्या दिवशी त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी करा. हे सर्व पुत्रासोबत पित्याला अर्पण करा. देव तुमचे अर्पण निर्मळ आणि पवित्र बलिदान म्हणून स्वीकारेल (पाहा दैनंदिनी #531).
तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ती देवाला अर्पण करता का? पुष्कळदा आपण या ना त्या गरजेसाठी प्रार्थना करतो आणि तिथेच थांबतो. आपल्या गरजा देवापुढे मांडणे चांगले आहे. आपण त्या त्याच्यापुढे मांडण्याआधीच त्याला त्या माहीत असतात. तरीही आपल्या प्रत्येक गरजेसाठी आपण त्याच्याकडे मागावे, अशी त्याची इच्छा आहे. पण प्रार्थनेत तेवढ्यावरच थांबू नका. तुम्ही त्यापुढे जावे, अशी प्रभूची इच्छा आहे. तुम्ही त्याग करावा, असे त्याला वाटते. तुमची प्रार्थना दररोज देवाला अर्पण केलेले बलिदान बनते का, यावर चिंतन करा. अर्पण आणि त्याग यांचा विचार करण्याची सवय नसेल, तर ती आता लावून घ्या. तुमच्या दैनंदिन जीवनात आणि प्रार्थनेत त्यागभावनेने विचार करा आणि वागा. प्रभू तुमचे बलिदान स्वीकारेल आणि तुम्हाला व संपूर्ण ख्रिस्तसभेला पवित्रतेत वाढवण्यासाठी त्याचा प्रभावीपणे उपयोग करील.
हे प्रभू, तू आपल्या जीवनाचे परिपूर्ण बलिदान पित्याला अर्पण केलेस. इतकेच नव्हे, तर खरी प्रार्थना कशी करावी याचा परिपूर्ण आदर्शही तू माझ्यासमोर ठेवलास. माझ्या जीवनाचे बलिदान दररोज तुला अर्पण करण्यास मला मदत कर, जेणेकरून या बलिदानाद्वारे तू मला पवित्र करशील आणि तुझ्या ख्रिस्तसभेला पवित्रतेत अधिक वाढवशील. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
23 एप्रिल – संत जॉर्ज, रक्तसाक्षी
संत अडलबर्ट, बिशप आणि रक्तसाक्षी
पास्का काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतने
ई-पुस्तक आणि मऊ मुखपृष्ठाची छापील आवृत्ती या दोन्ही स्वरूपांत उपलब्ध:
अॅमेझॉन – बार्न्स अँड नोबल – गूगल प्ले – आयट्यून्स
दैवी दयेवरील दैनिक चिंतन:
संत फॉस्टिनासोबत 365 दिवस





