मराठी

चिंतन 341: हे माझ्या जिवा, प्रभूची आराधना कर

निसर्गाचा एखादा अद्भुत चमत्कार तुम्ही पाहिला असेल, तर तो नजरेस पडताच मन किती थक्क होते, हे तुम्हाला ठाऊक असेल. ग्रँड कॅन्यन, नायगारा धबधबा किंवा स्विस आल्प्स पर्वतरांग पहिल्यांदा पाहताना तुम्ही क्षणभर श्वास रोखून पाहाल आणि देवाच्या सृष्टीच्या दर्शनाने तुमचे मन आराधनेत तल्लीन होईल. पण…

चिंतन 339: निर्मळ आत्मा

हे कदाचित लगेच लक्षात येणार नाही, पण ज्या आत्म्याचे देवावर निर्मळ प्रेम असते, त्याची अनेकांना भीती वाटते. त्यांना वाटणारी ‘भीती’ म्हणजे अशा आत्म्याला विरोध करण्याची भीती. दुष्ट हेतू असलेले लोक अशा व्यक्तीवर हल्ला करण्याचे धाडस करणार नाहीत, कारण तो हल्ला त्यांच्यावरच उलटू शकतो, हे त्यांना माहीत असते. हे अशक्य आहे…

चिंतन 337: इतरांना त्यांच्या चिंतेत मदत करणे

आपल्या आयुष्यात अस्वस्थ, व्यथित किंवा काळजीत असलेली माणसे अधूनमधून भेटतातच. एखाद्या गोष्टीचा विचार त्यांच्या मनात सतत घोळत राहू शकतो; कधी कधी त्यांच्या विचारांत फारसा तर्कही नसतो. दया दाखवण्याची ही किती कृपामय संधी आहे! चिंता…

चिंतन 335: सदैव क्षमा करणे 

जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करणे आणि त्यांच्याशी अत्यंत आदराने व करुणेने वागणे, ही जीवनातील सर्वांत कठीण गोष्टींपैकी एक आहे. पण त्यांचा द्वेष करून किंवा त्यांच्यावर राग काढून काय साधते? असे करून तुम्ही त्यांची जी “हानी” करता, तिच्यापेक्षा तुमच्या स्वतःच्या आत्म्याची कितीतरी जास्त हानी होते. क्षमा करा…

चिंतन 334: आत्म्यांची सेवा

इतरांची सेवा करण्याची क्षमता हा आपल्याला मिळालेल्या सर्वांत मोठ्या आशीर्वादांपैकी एक आहे.  आपण अनेक प्रकारे त्यांची सेवा करतो, विशेषतः आपापल्या जीवनपाचारणाला अनुसरून.  पण देवाच्या दयेचे सेवक बनून एखाद्या व्यक्तीला त्या वैभवाकडे नेणे, हीच आपण त्या व्यक्तीची करू शकणारी सर्वांत मोठी सेवा आहे…

चिंतन 333: साधेपणा

कधीकधी जीवन गुंतागुंतीचे वाटते आणि आपण स्वतःही तसे भासू शकतो. पण खरे तर, जीवनाच्या गुंतागुंतीपलीकडे पाहून आपण हे समजून घेतले पाहिजे की देवाच्या दृष्टीने आणि त्याच्या इच्छेनुसार जीवन साधे आहे. ते या अर्थाने साधे आहे की आपण फक्त रोज त्याला “हो” म्हणायचे, सर्व काही त्याच्या हाती सोपवायचे आणि त्याच्यावर विश्वास ठेवायचा…