मराठी

चिंतन १०: दैवी दयेची प्रेषितीय चळवळ

संत फॉस्टिनाची दैनंदिनी आपल्याला विविध प्रकारे भक्तीच्या एका नव्या स्वरूपाकडे बोलावते. वैयक्तिक भक्ती करण्याबरोबरच दयेचे प्रेषित होण्याचेही आपल्याला आवाहन आहे. तुम्ही दयेचे प्रेषित आहात का? ही प्रेषितीय चळवळ…

चिंतन 364: मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्यांसाठी प्रार्थना

तुमच्या शाश्वत तारणाच्या दृष्टीने तुमच्या मृत्यूची घटका अत्यंत महत्त्वाची आहे. ‘नमो मारिये’ ही प्रार्थना म्हणताना तुम्ही विशेषतः या पवित्र घटकेसाठी प्रार्थना करता. ही एक पवित्र घटका आहे. पण याच घटकेला दुष्ट आत्मा तुमच्यावर पुन्हा एकदा झडप घालून हिरावून घेण्याचा प्रयत्न करील…

चिंतन 361: त्याग आणि प्रार्थना

हे समजून घेणे आणि यावर विश्वास ठेवणे कठीण वाटले, तरी शुद्ध प्रार्थनेशी जोडलेला अंतःकरणातील त्याग जगभर सुवार्तेच्या घोषणेसाठी अतिशय फलदायी ठरतो. खरे तर, दररोज अंतःकरणातून अर्पण करणाऱ्या पवित्र आत्म्यांच्या आध्यात्मिक सामर्थ्याचे पाठबळ धर्मप्रसारकांना लाभले नसते तर…

चिंतन 355: निरर्थक बोलणे, आत्म्याच्या आळशीपणाचे लक्षण

काही जण इतरांबद्दल बोलण्यात फार पटाईत असतात. जणू काही त्यांना सगळेच कळते, अशा थाटात ते इतरांबद्दल मोकळेपणाने बोलतात, सतत मते मांडतात आणि त्यांना दोष देतात. तुम्ही अशा लोकांसारखे होऊ नका. इतरांच्या कृतींमध्येच ज्यांचे मन आणि जीभ गुंतलेली असतात…

चिंतन 353: गौरवाचे स्तोत्र

संगीतातून देवाच्या सृष्टीतील नैसर्गिक नियमांचा शोध लागतो आणि ते नियम व्यक्तही होतात. सृष्टीच्या रचनेत असलेल्या क्रम आणि लयीवर संगीत आधारलेले असते. काही संगीत सृष्टीतील या नैसर्गिक व्यवस्थेचा उपयोग लौकिक गोष्टींचा गौरव करण्यासाठी करते. संगीताचे काही प्रकार तर पाप आणि अव्यवस्थाही व्यक्त करतात. पण…

चिंतन 352: ताडन आणि अपराधभावना

देवाच्या ताडनाचा विचार करणे कदाचित सुखावह नसेल. पण त्याचे ताडन खरे आहे आणि ते त्याच्या विपुल दयेची कृती आहे, हे समजून घेतले पाहिजे. जेव्हा आत्मे देवापासून दूर जातात आणि त्याची दया नाकारतात, तेव्हा त्याच्या हृदयाला खोल जखम होते. त्यामुळे देव…

चिंतन 351: देवाला जाणणे की त्याचा अनुभव घेणे

देवाला जाणून घेणे हे तुमचे नेहमीचे ध्येय असले पाहिजे. पवित्र शास्त्राचा अभ्यास, ख्रिस्तसभेची शिकवण आणि संतांची जीवनचरित्रे या सर्वांची या प्रयत्नात मदत होते. पण देवाला जाणणे हे जीवनाचे अंतिम ध्येय नाही. ज्ञान श्रद्धेतून येते आणि श्रद्धा ही देवाची देणगी आहे. पण पूर्णपणे…

चिंतन 350: आराधनेतील सौंदर्य

जग सुंदर आहे आणि त्यातून देवाचे सौंदर्य प्रकट होते; पण पवित्र युकरिस्तासारखी आध्यात्मिक सत्ये त्याहून कितीतरी सुंदर आहेत.  परमपवित्र युकरिस्तात उपस्थित असलेल्या देवाचे सौंदर्य पाहण्यासाठी श्रद्धेची दृष्टी हवी.  हे सौंदर्य अधिक स्पष्टपणे पाहता यावे, यासाठी आराधना हा एक उत्तम मार्ग आहे.  स्वीकारणे जरी…

चिंतन 346: इतरांना लाभलेली वरदाने

इतरांच्या जीवनात देवाने दिलेली वरदाने ओळखणे आणि त्याबद्दल आनंद मानणे, ही त्यांच्याप्रती दया दाखवण्याची एक कृती आहे.  दुर्दैवाने, इतरांचा मत्सर किंवा हेवा करण्याचा मोह अनेकदा होतो, विशेषतः त्यांची नैसर्गिक प्रतिभा किंवा त्यांच्या जीवनातील देवाची कृपा दिसते तेव्हा.  पण…

चिंतन 345: देवामध्ये तल्लीन होणे

तुम्ही कधी देवामध्ये तल्लीन झाला आहात का?  बहुतेकांना असा अनुभव क्वचितच येतो, तर कित्येकांना तो कधीच येत नाही.  देवामध्ये तल्लीन होणे, म्हणजे प्रार्थनेत इतके खोलवर बुडून जाणे की त्याच्या सान्निध्यात आपण हरवून गेलो आहोत असे वाटते.  असे घडते तेव्हा प्रभू तुम्हाला पूर्णपणे आपल्या अधीन करतो…