मराठी

चिंतन 184: पुरोहितांच्या सेवाकार्यातून लाभणारी दया

नाही, पुरोहित परिपूर्ण नाहीत.  त्यांच्याकडूनही दिवसेंदिवस पापे घडतात.  इतर सर्व माणसांप्रमाणेच त्यांनाही दैनंदिन जीवनात सतत पश्चात्ताप करण्याची आणि देवाकडे वळण्याची गरज असते.  तरीही ते पुरोहित आहेत.  आणि त्यांच्या पवित्र पुरोहिताभिषेकामुळे प्रभू त्यांच्याद्वारे स्पष्टपणे बोलतो, तरी…

चिंतन 149: अंतःकरणातील प्रेरणा

गरजूंपर्यंत देवाची दया पोहोचवण्याच्या असंख्य संधी आपल्या सभोवती आहेत. पण या संधी आपल्या नकळत सहज निसटून जातात. दैवी दयेचे साधन बनण्याचा एक प्रमुख मार्ग म्हणजे सतत लक्ष देण्याचा प्रयत्न करणे…

चिंतन 135: येशूशी संवाद

तुम्ही येशूशी संवाद साधता का?  प्रार्थनेचा हा एक अतिशय फलदायी प्रकार आहे.  देवाशी ‘संवाद’ साधणे हा प्रार्थनेचा सर्वोच्च प्रकार नाही, पण अनेकदा आपल्याला याच प्रकारच्या प्रार्थनेने सुरुवात करावी लागते.  मनावर एखादे ओझे असते, तेव्हा देवाशी संवाद साधणे विशेष फलदायी ठरते…

चिंतन 64: देवाचा आवाज ऐकणे

तुम्ही चर्चमध्ये असता तेव्हा लक्ष देऊन ऐकता का? विशेषतः, तुम्ही देवाचा आवाज ऐकता का? अनेकदा आपण प्रवचन ऐकायला बसतो, पण आपले मन भरकटते आणि प्रवचनात सांगितलेले सगळेच किंवा त्यातले बरेचसे आपल्या कानावरून जाते. तुमचे मन कुठे भरकटते? खरे तर, कधीकधी मनाचे असे भरकटणे…

चिंतन 15: देवाचे प्रेम कधीच थांबत नाही

तुम्ही देवाच्या हाकेला ‘नंतर’ म्हणता का? तो सतत हाक देतो, पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता का? लक्ष विचलित करणाऱ्या असंख्य गोष्टींमध्ये तुम्ही त्याचा आवाज दडपून टाकता का? लक्षात ठेवा, देव तुम्हाला हाक देणे कधीच थांबवत नाही. त्याचे ऐका. कधीकधी आपण देवाच्या हाकेला ‘नंतर’ म्हणतो, कारण दुसऱ्या एखाद्या मार्गाने जीवनात समाधान मिळेल, असे आपल्याला चुकीने वाटते…

चिंतन 363: देवाची वाणी ऐकणे

कल्पना करा की तुम्ही एका गजबजलेल्या खोलीत आहात. तिथे खूप गोंगाट आहे आणि खोलीच्या दुसऱ्या टोकाहून कुणीतरी तुमच्याशी कुजबुजून बोलत आहे. ती व्यक्ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे, हे तुमच्या लक्षात येईल; पण तिचे बोलणे ऐकू येणे कठीण जाईल. देवाच्या वाणीचेही असेच आहे. देव बोलतो तेव्हा तो कुजबुजतो. तो अगदी हळुवारपणे बोलतो…

चिंतन 357: कृपेच्या प्रेरणा

एखादी व्यक्ती व्याकुळ असते तेव्हा तुम्ही कदाचित तिच्याशी बोलणे टाळता. तिच्याशी बोलण्यात आपला बराच वेळ आणि शक्ती खर्च होईल, असे सहज वाटू शकते. पण तुमच्या संवादाला प्रभू दिशा देत असेल, तर तो थोड्याच वेळात अद्भुत गोष्टी घडवू शकतो. अर्थात, असेही काही प्रसंग असतात…

चिंतन 348: देव जे प्रकट करतो ते पूर्ण करतो

दोन गोष्टींचा एकत्र विचार केला तर आश्चर्य वाटते. पहिली गोष्ट अशी की, दरवर्षी ईस्टरच्या दुसऱ्या रविवारी दैवी दयेचा सण साजरा करण्याची अधिकृत घोषणा व्हावी आणि तो सण साजरा केला जावा, अशी आपली इच्छा असल्याचे येशूने संत फॉस्टिनाला वारंवार सांगितले आणि तिने ते ऐकले. मठात एकांतवासात राहणाऱ्या या साध्या धर्मभगिनीला असे काम कसे साधणार होते…

चिंतन 338: गुपित जपणे

कोणी आपल्याला विश्वासाने सांगितलेली गोष्ट गुप्त ठेवणे, ही त्या व्यक्तीवर प्रेम करण्याची एक रीती आहे.  कोणी अडचणीत किंवा संभ्रमात असताना आपल्याकडे येते आणि सांगितलेली गोष्ट आपल्यापुरतीच ठेवायला सांगते, असा अनुभव आपल्या सर्वांनाच आला आहे.  अशा प्रकारचे पवित्र गुपित तुम्ही जपू शकता का?  इतरांनी विश्वासाने सांगितलेली गोष्ट गुप्त ठेवणे, ही त्यांच्याशी दयाळूपणे वागण्याची एक सुंदर रीती आहे.  जर…