मराठी

चिंतन 30: देवाच्या आज्ञांचे पालन

आज्ञापालन हा पवित्रतेचा एक महत्त्वाचा मार्ग आहे.  आज्ञाभंगामुळे आदाम आणि हव्वा देवाच्या कृपेला मुकले, तर आज्ञापालनामुळे आपल्याला ती कृपा पुन्हा लाभते.  आज्ञापालन कठीण जाऊ शकते आणि त्यासाठी अंतःकरणातून ठाम निर्णय घ्यावा लागतो.  येशूच्या आज्ञा पाळण्याच्या संधी शोधा, विशेषतः जेव्हा तुम्हाला…

चिंतन 29: सांत्वनाचे क्षण

आपण दररोज मनापासून देवाचा शोध घेत असलो, तर अगदी योग्य वेळी आपल्याला सांत्वनाचा एखादा क्षण लाभतो. कधी अनपेक्षितपणे शांती किंवा आनंद मिळतो, कधी नवी समज आणि धीर मिळतो, तर कधी आपल्याला केवळ देवाची उपस्थिती जाणवते, आपल्या…

चिंतन 28: तक्रार करण्याचे मोह

कधीकधी आपल्याला तक्रार करण्याचा मोह होतो. देवावर, त्याच्या परिपूर्ण प्रेमावर आणि त्याच्या परिपूर्ण योजनेवर प्रश्न उपस्थित करण्याचा मोह होतो तेव्हा हे लक्षात ठेवा की तो केवळ एक मोह आहे, त्यापेक्षा अधिक काही नाही…

चिंतन 27: परीक्षांचे सद्गुणांत रूपांतर

कधीकधी देव आपली परीक्षा घेतो. आपल्याला बळ देण्यासाठी आणि त्याच्यावरील आपले प्रेम अधिक गाढ व्हावे म्हणून तो प्रेमाने असे करतो. तुम्हाला कोणती गोष्ट परीक्षा वाटते, याचा विचार करा. ही परीक्षा त्याच्याकडून आली आहे का आणि तिच्यातून कोणते भले घडवण्याची त्याची इच्छा आहे, हे देवाला विचारा. प्रत्येक परीक्षेत अशी शक्यता असते की…

चिंतन 26: आपला अंतःकरणातील क्रूस ख्रिस्ताशी जोडणे

तुम्ही देवाच्या अधिक जवळ जाल, तसे तुम्हाला कधी कधी वेगवेगळ्या भावना जाणवतील.  काहींना देवाने आपल्याला नाकारले आहे, असे वाटेल.  देव आपल्याला कधीच नाकारत नाही; पण त्याने आपल्याला नाकारल्याची भावना अंतःकरणात खरोखर जाणवू शकते.  त्यामुळे काही जण आशा गमावतात.  आता किंवा पुढे कधी तुम्हालाही असे वाटले तर…

चिंतन 25: अंतर्मनातील दुःख — दयेकडे नेणारा मार्ग

देवाशी तुमचे नाते अधिक गहिरे होत जाईल, तसे तुम्हाला संघर्षाचे अनेक क्षण येतील, तसेच सांत्वनाचेही अनेक क्षण लाभतील.  आध्यात्मिक कोरडेपणाच्या आणि अंतर्मनातील दुःखाच्या क्षणांना घाबरू नका.  असे क्षण आवश्यक आहेत; पवित्रतेकडे नेण्याच्या देवाच्या मार्गाचाच ते एक भाग आहेत…

चिंतन 24: आपल्या आत्म्याचे शुद्धीकरण

देवाच्या भेटीसाठी आत्मा तळमळतो, तेव्हा होणारी वेदना ही आपण सहन करू शकणारी सर्वांत मोठी वेदना आहे. शुद्धीस्थानातील आत्म्यांना फार दुःख होते, कारण त्यांना देवाची ओढ आहे, पण देव अजून पूर्णपणे त्यांचा झालेला नाही. आपणही इथेच आणि आत्ताच या शुद्धीकरणाला सामोरे गेले पाहिजे. आपण आपल्या मनात देवाची ओढ जागी होऊ दिली पाहिजे. आपण…

चिंतन 23: जेव्हा देव मौन आहे असे वाटते

आपल्या दयाळू प्रभूला अधिकाधिक जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो, तेव्हा कधीकधी तो मौन आहे असे वाटते.  कदाचित पाप आड आले असेल, किंवा देवाविषयीच्या तुमच्या स्वतःच्या कल्पनेमुळे त्याचा खरा स्वर तुम्हाला ऐकू येत नसेल आणि त्याची खरी उपस्थिती तुम्हाला जाणवत नसेल.  इतर वेळी येशू आपली उपस्थिती लपवतो…

चिंतन 22: तुमच्या आत्म्याची ग्रहणक्षमता वाढवणारी विपुल दया

तुमच्या आत्म्यात येशूची भेट झाली की, त्याच्या आणखी जवळ जाण्याची ओढ तुमच्यात निर्माण होते. तुम्हाला येशूच्या आणखी जवळ जावेसे वाटते का? तुम्हाला त्याच्या दयेची आस आहे का? त्याची ओढ, त्याच्या अधिक जवळ जाण्याची आस, आपले अंतःकरण विशाल करते आणि दररोज त्याची अधिक दया स्वीकारण्यास आपल्याला समर्थ बनवते. ही ओढ…

चिंतन 21: तुमच्यावर प्रेम आहे.  हे खरे आहे, असा विश्वास ठेवा.

ख्रिस्ताने तुमचा स्वीकार केला आहे. त्याच्या दयाळू हृदयात राहिल्याने तो तुमच्यावर किती प्रेम करतो, हे तुम्हाला उमगेल.  तुमच्या कल्पनेपलीकडे तो खरोखरच तुमच्यावर प्रेम करतो.  ते प्रेम हळूहळू स्वतः अनुभवू लागा.  त्या प्रेमाचा आस्वाद घ्या, ते खरे आहे यावर विश्वास ठेवा, ते समजून घ्या आणि अधिक उत्कटतेने त्याचा शोध घ्या…