प्रतिमा साभार: Needpix.com
कधीकधी आपल्याला तक्रार करण्याचा मोह होतो. देवावर, त्याच्या परिपूर्ण प्रेमावर आणि त्याच्या परिपूर्ण योजनेवर प्रश्न उपस्थित करण्याचा मोह होतो तेव्हा लक्षात ठेवा: तो दुसरे काही नाही… केवळ एक मोह आहे. देवाच्या प्रेमाविषयी शंका घेण्याचा आणि त्यावर प्रश्न उपस्थित करण्याचा मोह होत असतानाच त्याच्यावर पुन्हा विश्वास ठेवा आणि स्वतःची कीव करणे सोडून द्या. असे केल्याने तुम्हाला बळ मिळेल (पाहा: दैनंदिनी #25).
या आठवड्यात तुम्ही सर्वांत जास्त कशाबद्दल तक्रार केली? कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला सर्वांत जास्त रागावावेसे वाटते किंवा चिडचिड होते? या मोहामुळे तुम्हाला स्वतःची कीव वाटू लागली आहे का? देवाच्या परिपूर्ण प्रेमावरील तुमचा विश्वास त्यामुळे डळमळीत झाला आहे का? या मोहावर चिंतन करा आणि प्रेमात व सद्गुणांत वाढण्याचे एक साधन म्हणून त्याकडे पाहा. अनेकदा आपल्या सर्वांत कठीण संघर्षातच पवित्रतेत वाढण्याचे सर्वांत प्रभावी साधन दडलेले असते.
हे प्रभू, जेव्हा जेव्हा मी तक्रार करतो, रागावतो आणि तुझ्या परिपूर्ण प्रेमाविषयी शंका घेतो, तेव्हा तेव्हा केलेल्या या गोष्टींचा मला पश्चात्ताप होतो. स्वतःची कीव करण्याच्या भावनांना मी माझ्या मनात थारा दिला, याचाही मला पश्चात्ताप होतो. आज या भावना सोडून द्यायला मला मदत कर, म्हणजे मोहाच्या या क्षणी मी तुझ्यावर अधिक दृढ विश्वास ठेवीन आणि स्वतःला अधिक पूर्णपणे तुझ्या हाती सोपवीन. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
28 जानेवारी: संत थॉमस अक्विनास, याजक आणि चर्चचे धर्मपंडित — स्मृतिदिन
सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन




